MS Dhoni  Dainik Gomantak
क्रीडा

माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आणि पार्थिव पटेल धोनीवर नाराज कारण...

दैनिक गोमन्तक

चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा 15वा हंगाम आतापर्यंत निराशाजनक राहिला आहे. चार वेळेच्या चॅम्पियन संघाला सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. नवीन कर्णधार रवींद्र जडेजाच्या नेतृत्वाखाली गतविजेता चेन्नईला पहिल्या विजयाचे वेध लागले आहेत. (Ajay Jadeja and parthiv patel unhappy with MS Dhoni)

त्यांना प्रथम कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर गुरुवारी लीगच्या नवीन संघ लखनऊ सुपर जायंट्सनी त्यांचा पराभव केला. या सामन्यादरम्यान माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) पूर्वीप्रमाणेच सक्रिय दिसला आणि बहुतांश निर्णय तो स्वत:च घेत होता, असे अनेकांचे मत आहे.

सामना संपल्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने धोनीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली. क्रिकबझ शोमध्ये बोलताना तो म्हणाला की, जर तुम्ही एखाद्याला नवीन कर्णधार म्हणून नियुक्त केले असेल आणि असे असूनही तुम्ही सामन्यातील सर्व निर्णय स्वतः घेत असाल तर ते चुकीचे आहे.

माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलनेही नाराजी व्यक्त केली. "जर तुम्ही स्वतः कर्णधारपद सोडले असेल, तर जडेजाला निर्णय घेऊ द्या, त्याला शिकू द्या, तरच तो अधिक चांगले करू शकेल," तो म्हणाला. सामन्यानंतर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) या पराभवाबद्दल बोलताना म्हणाला, "आमची फलंदाजी चांगली होती पण क्षेत्ररक्षणात आम्ही कमकुवत होतो, आम्ही झेल सोडले त्यामुळे आम्ही सामना गमावला."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

Eco Green Cement: 'इको ग्रीन सिमेंट' ठरणार बांधकाम क्षेत्रासाठी वरदान; विद्यार्थ्यांचा क्रांतिकारक प्रकल्प

SCROLL FOR NEXT