Agni Dev Chopra Instagram
क्रीडा

12th Fail चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा मुलगा गाजवतोय क्रिकेटचं मैदान; चार रणजी सामन्यात ठोकलीत 5 शतके

Agni Dev Chopra: 12th Fail चित्रपटाचे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा मुलगा सध्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळत असून त्याने ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे.

Pranali Kodre

Agni Dev Chopra son of director Vidhu Vinod Chopra scored five centuries in first four Ranji Trophy matches:

भारतात रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धा सध्या खेळली जात आहे. या स्पर्धेत सध्या एक खेळाडू आपल्या फलंदाजीने सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे, हा खेळाडू म्हणजे अग्नी देव चोप्रा. त्याने एक मोठा विश्वविक्रमही केला आहे.

सिक्किमकडून अग्नी देव चोप्रा खेळत असून त्याने 2024 मध्येच रणजी ट्रॉफीतून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे त्याने आत्तापर्यंत रणजी ट्रॉफीच्या चार सामन्यांमध्ये खेळताना पाच शतके केली आहेत.

म्हणजेच त्याने पदार्पणपासून खेळलेल्या चारही सामन्यात शतके केली आहेत, त्यामुळे तो कारकिर्दीतील पहिल्या चारही प्रथम श्रेणी सामन्यात शतक करणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

25 वर्षीय अग्नीने पहिला सामना मिझोरमविरुद्ध खेळला, ज्यात त्याने पहिल्या डावात 166 धावा आणि दुसऱ्या डावात 92 धावा केल्या. नंतर त्याने दुसरा सामना नागालँडविरुद्ध खेळला, ज्यात त्याने पहिल्या डावात 164 आणि दुसऱ्या डावात 15 धावा केल्या.

त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध तिसरा सामना खेळताना पहिल्या डावात 114 धावा केल्या असून दुसऱ्या डावात 10 धावा केल्या. तसेच त्याने मेघालयाविरुद्धच्या चौथ्या सामन्यात दोन्ही डावात शतके केली. त्याने पहिल्या डावात 105 धावा आणि दुसऱ्या डावात 101 धावा केल्या आहेत.

त्यामुळे त्याच्या यंदाच्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत 4 सामन्यांतील 8 डावात 95.88 च्या सरासरीने 767 धावा झाल्या आहेत. तो यंदाच्या हंगामातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे.

चित्रपट सृष्टीत आई-बाबांचे काम

दरम्यान क्रिकेटच्या मैदानात शानदार कामगिरी करणाऱ्या अग्नीचे आई-बाबा चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत. त्याचे वडील प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते विधू विनोद चोप्रा आहेत.

त्यांनी थ्री इडियट्स, मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई आणि 12th फेल अशा प्रसिद्ध चित्रपटांचे काम केले आहे. नुकताच त्यांनी दिग्दर्शित केलेला 12th फेल चित्रपट प्रचंड गाजला आहे. त्यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर 2024 चा पुरस्कारही जाहीर झाला आहे.

तसेच विधू विनोद चोप्रा यांची पत्नी व अग्नीची आई अनुपमा चोप्रा या देखील लेखक, चित्रपट समिक्षक आणि पत्रकार आहेत. तसेच फिल्म कम्पॅनियनच्या फाउंडर आणि एडिटर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei Sanctuary Issue: सीमा ठरवणार, वस्ती हलवणार? म्हादई अभयारण्यात वस्तीला परवानगी नाही, व्याघ्र प्रकल्पाचा पर्याय हुकल्याने गोंधळ; क्लॉड आल्वारिस यांनी स्पष्टच सांगितलं

Goa Robbery Incident: सराफा दुकानाचे शटर फोडले, सीसीटीव्हीवर स्प्रे मारला, पण पोलिसांच्या 'सतर्कते'मुळे चोरट्यांचा चोरीचा डाव फसला; चावडी बाजारात मध्‍यरात्री थरार!

Horoscope: नवीन संधी येऊ शकते, महत्त्वाच्या निर्णयात संयम हवा! वाचा तुमच्या राशीचे भविष्य

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

SCROLL FOR NEXT