Sarfaraz Khan  Dainik Gomantak
क्रीडा

Sarfaraz Khan: 'हॅट्स ऑफ'! इग्नोर करणाऱ्या टीम इंडियाच्या सिलेक्टर्सला सर्फराजचं शतकाहसह चोख उत्तर

सर्फराजने शतक केल्यानंतर जोरदार सेलिब्रेशन केले, यादरम्यान अमोल मुजुमदारच्या रिऍक्शननेही लक्ष वेधले.

Pranali Kodre

Sarfaraz Khan: मुंबईचा क्रिकेटपटू सर्फराज खान सध्या बराच चर्चेत आहे. गेल्या तीन वर्षात चांगली कामगिरी करूनही भारतीय संघात त्याची निवड न झाल्याने त्याच्याबद्दल चर्चा होत आहेत. असे असतानाच आता त्याने मंगळवारी मुंबईकडून दिल्लीविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात शतक ठोकले आहे.

भारतीय संघाला आगामी काळात न्यूझीलंडविरुद्ध टी20 आणि वनडे मालिका खेळायची आहे. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका आणि वनडे मालिका खेळायची आहे. दरम्यान यातील न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकेसाठी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

यातील कोणत्याही भारतीय संघात दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या सर्फराज खानला संधी मिळालेली नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. अनेक माजी क्रिकेटपटूंनीही त्याला संधी मिळाली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना ट्वीटही केले.

दरम्यान, अशा परिस्थितीतही सर्फराजने त्याचा फॉर्म कायम ठेवला आहे. त्याने दिल्लीविरुद्ध मुंबईकडून पहिल्या डावात 155 चेंडूत 125 धावा केल्या आहेत. यात त्याने 16 चौकार आणि 4 षटकार मारले.

या खेळीदरम्यान त्याला दिल्लीचा यष्टीरक्षक अनुज रावतकडून दोनवेळा जीवदानही मिळाले. याचा त्याने फायदा घेत चालू रणजी ट्रॉफी स्पर्धेत तिसरे शतक ठोकले. त्याने हे शतक ठोकल्यानंतर जोरदार सेलिब्रेशनही केले. त्याने मांडी थोपटत त्याचा आनंद साजरा केला.

तसेच त्याने हे शतक ठोकताच मुंबई संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने त्याला उभे राहत प्रोत्साहन दिले. त्याचबरोबर मुंबईचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी केलेल्या कृतीने अनेकांची मने जिंकली. त्यांनी सर्फराजने शतक करताच त्यांच्या डोक्यावरील टोपी काढत त्याच्या शतकाचे कौतुक केले.

(Sarfaraz Khan smashed another century in Ranji Trophy 2022-23)

सर्फराजची दमदार कामगिरी

सर्फराजने चालू हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये 500 धावांचा टप्पाही पार केला आहे. त्यापूर्वी त्याने गेल्या दोन रणजी हंगामातही 900 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तो 2021-22 रणजी हंगामात सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज होता. त्याने 2021-22 रणजी हंगामात ६ सामन्यात सर्वाधिक 982 धावा केल्या होत्या. त्यात त्याच्या 4 शतके आणि 2 अर्धशतकांचा समावेश होता.

त्याचबरोबर त्याने दुलीप ट्रॉफी 2022 स्पर्धेतही एका सामन्यात खेळताना 161 धावांची खेळी केलेली. तसेच इराणी ट्रॉफी 2022 सामन्यातही सर्वाधिक 138 धावा केल्या होत्या. या कामगिरीनंतर त्याला भारताच्या कसोटी संघात संधी मिळेल अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, त्याला ही संधी मिळाली नाही.

मुंबईचा पहिला डाव पहिल्याच दिवशी संपला

मंगळवारी दिल्लीविरुद्ध सुरु झालेल्या रणजी सामन्यात मुंबईचा पहिला डाव 79.2 षटकात 293 धावांवर संपुष्टात आला आहे. या डावात सर्फराज व्यतिरिक्त कोणालाही 50 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सर्फराजनंतर पृथ्वी शॉने सर्वाधिक 40 धावांची खेळी केली. दिल्लीकडून प्रांशु विजयराने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT