Afghanistan Cricket 
क्रीडा

IND vs AFG: भारताविरुद्ध T20 मालिकेसाठी अफगाणिस्तान टीमची घोषणा; 19 खेळाडूंना मिळाले स्थान

India vs Afghanistan, T20I Series: भारताविरुद्ध होणाऱ्या आगामी टी20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा झाली आहे.

Pranali Kodre

Afghanistan squad for three-match T20I series against India:

भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा नुकताच संपला असून आता भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. दरम्यान, आता भारत आणि अफगाणिस्तान संघात 11 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारत आणि अफगाणिस्तान संघात होणारी टी20 मालिका भारतात होणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात 19 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

या संघात वर्ल्डकप 2023 नंतर पहिल्यांदाच राशीद खानचे पुनरागमन झाले आहे. मात्र, त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याच्या पाठीवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तो तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, त्याच्यावर खेळण्यावर प्रश्नचिन्ह असल्याने त्याच्या जागेवर इब्राहिम झाद्रानकडे प्रभारी कर्णधार करण्यात आले आहे. त्याने काहीदिवसांपूर्वीच राशीदच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानचे नेतृत्व करताना युएईविरुद्ध 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली होती.

याशिवाय इक्रम अलिखिल आणि मुजीब उर रेहमान यांनाही भारताविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात संधी देण्यात आली आहे.

या टी20 मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीला मोहालीला होणार आहे, तसेच दुसरा सामना इंदूरला 14 जानेवारीला रंगेल, तर 17 जानेवारीला बंगळुरूला तिसरा टी20 सामना होणार आहे.

असा आहे अफगाणिस्तान संघ -

इब्राहिम झाद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झाद्रान, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमउल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारुकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि राशीद खान.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान, टी२० मालिकेचे वेळापत्रक

  • 11 जानेवारी - पहिला टी20 सामना, मोहाली (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 14 जानेवारी - दुसरा टी20 सामना, इंदूर (वेळ - संध्या. 7 वाजता)

  • 17 जानेवारी - तिसरा टी20 सामना, बंगळुरू (वेळ - संध्या. 7 वाजता)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Employee Marital Data: 12,907 कर्मचारी 'शुभमंगल' विना; नियोजन, सांख्‍यिकी मूल्‍यमापन खात्‍याच्‍या अहवालातून समोर

Betul Port Project: बेतुलात बंदर प्रकल्प नकोच! कॉंग्रेस, फॉरवर्डचे एकमत; 'एमपीए'च्या उपक्रमाला स्थानिकांतून विरोध

Smriti Mandhana Wedding: आधी वडिलांना हृदयविकाराचा झटका, आता होणाऱ्या नवऱ्याचीही तब्येत बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

Pooja Naik: सरकारी नोकऱ्या गुणवत्तेनुसारच दिल्‍या गेल्या! 'कॅश फॉर जॉब' आरोपांना चौकशी अहवालानंतर उत्तर, ढवळीकरांचं स्‍पष्‍टीकरण

91.45% गोमंतकीयांचा टेलिफोनला 'बाय बाय'! वापरकर्त्यांची संख्‍या 1.32,261 वरून 11,314

SCROLL FOR NEXT