Rashid Khan Dainik Gomantak
क्रीडा

अफगाणिस्तान हरला पण... रशीद खानने केला विश्वविक्रम

ICC T20 विश्वचषकादरम्यान (ICC T20 World Cup) अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने शुक्रवारी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात एक मोठा विक्रम केला.

दैनिक गोमन्तक

ICC T20 विश्वचषकादरम्यान (ICC T20 World Cup) अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने (Rashid Khan) शुक्रवारी पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यात एक मोठा विक्रम केला. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा तो गोलंदाज ठरला. अफगाणिस्तानच्या दिग्गज खेळाडूने या क्रिडा प्रकारात श्रीलंकेचा माजी दिग्गज लसिथ मलिंगाला (Lasith Malinga) मागे टाकले आहे. रशीदने शुक्रवारी पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच हा विश्वविक्रम केला. आता एकदिवसीय आणि टी-20 दोन्हीमध्ये त्याच्या नावावर सर्वात वेगवान विकेट शतक करण्याचा विक्रम नोंदवला गेला आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील आयसीसी टी-20 विश्वचषकातील 24 वा सामना महत्त्वाचा मानला जात होता. गोलंदाजीत सर्वोतृष्ट असणाऱ्या अफगाण संघाचा कर्णधार मोहम्मद नबीने (Mohammed Nabi) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खराब सुरुवातीनंतरही संघाने 20 षटकांत 6 बाद 147 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने दोन महत्त्वपूर्ण विकेट घेत रशीदने आपल्या विकेट्सची संख्या 100 च्या पुढे नेली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी 99 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा रशीद हे स्थान मिळवणारा सर्वात जलद ठरला.

हाफिज 100 वा बळी ठरला

रशीदने पाकिस्तानच्या डावाच्या 15 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर टी-20 मध्ये 100 वी विकेट मिळवली. त्याने 14.1 चेंडूत 10 धावांवर मोहम्मद हाफीजला (Mohammed Hafeez) गुलबदिन नायबकडे (Gulbadin Naib) झेलबाद केले. यानंतर त्याने अर्धशतक झळकावल्यानंतर फलंदाजी करणाऱ्या कर्णधार बाबर आझमला क्लीन-बॉलिंग केले. तो 47 चेंडूत 51 धावा करुन परतला.

सर्वात जलद 100 T20 आंतरराष्ट्रीय विकेट्स

मलिंगाने 76 सामने खेळून T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी पूर्ण केले, तर राशिदने केवळ 53 सामने खेळून हा पराक्रम केला. बांगलादेशच्या शाकिब अल हसनने (Shakib Al Hasan) 84 सामन्यांमध्ये हे स्थान गाठले होते, तर न्यूझीलंडच्या टीम साऊदीनेही याच सामन्यात 100 टी-20 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण केल्या होत्या. राशिदने केवळ 44 वनडे खेळून या फॉरमॅटमध्ये 100 विकेट पूर्ण केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT