AFC Football matches will be played in Goa late at night 
क्रीडा

AFC champions league 2021:गोव्यात पहिल्यांदाच फुटबॉलचे सामने रात्री उशिरा

गोमंन्तक वृत्तसेवा

पणजी: गोव्यात आता रात्री उशिरा फुटबॉल सामने खेळले जाणार आहेत. आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या ई गटातील सामने अनुक्रमे रात्री आठ आणि साडेदहा वाजता खेळविण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे राज्यात प्रथमच रात्री उशिरापर्यंत फुटबॉल सामने होतील.

पश्चिम आशियातील क्लब संघात बहुतांश मुस्लिम फुटबॉलपटू असून रमझानच्या उपवासामुळे या संघांनी सामने उशिरा खेळविण्याची विनंती आशियाई फुटबॉल महासंघास (AFC) केली होती. त्या अनुषंगाने एएफसीने पत्र लिहून गोवा फुटबॉल असोसिएशनला (GFA) राज्य प्रशासनाकडून आवश्यक परवानगी घेण्यास सांगितले होते. रात्री उशिरा सामने खेळविण्यास गोवा सरकारने मंजुरी दिल्याची माहिती जीएफएचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव यांनी दिली. यासंदर्भात त्यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

अगोदरच्या वेळापत्रकानुसार, सामने संध्याकाळी पाच वाजता व रात्री साडेआठ वाजता नियोजित होते, पण उपवासामुळे संध्याकाळी पाच वाजता खेळणे फुटबॉलपटूंना कठीण ठरणारे होते. त्यामुळे सहभागी संघांनी सामन्याची वेळ बदलण्याची विनंती एएफसीला केली होती.

आशियाई चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या ई गटात इराणचा पर्सेपोलिस, कतारचा अल रय्यान, संयुक्त अरब अमिरातीचा अल वाहदा आणि भारताचा एफसी गोवा या चार संघांचा समावेश आहे. द्विसाखळी पद्धतीने सामने 14 ते 30 एप्रिल या कालावधीत खेळले जातील. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम स्पर्धेतील सामन्यांचे मुख्य केंद्र आहे. देशभरात कोरोना विषाणू महामारीने पुन्हा उग्र रूप धारण केल्यामुळे, तसेच गोव्यातही कोविड-१९ बाधितांचा संख्या वाढत आहे, त्यामुळे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) आशियाई चँपियन्स लीग स्पर्धेच्या ई गटातील गोव्यात होणारे सर्व सामने बंद दरवाज्याआड रिकाम्या स्टेडियममध्ये खेळविण्याचे ठरविले आहे.
 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marriage Certificate: गोव्यात 'डेस्टिनेशन वेडिंग' करणाऱ्यांसाठी मोठी खूषखबर; आता राज्यातच मिळणार मॅरेज सर्टिफिकेट! CM सावंतांची घोषणा

Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

SCROLL FOR NEXT