Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Calangute police Pardhi gang arrest: कळंगुट येथील एका आलिशान व्हिलामध्ये तोंडाला पट्टी बांधून घुसलेल्या आणि रहिवाशांना मारहाण करून रोख रक्कम लुटणाऱ्या आंतरराज्य ‘पारधी गँग’च्या मुसक्या आवळण्यात कळंगुट पोलिसांना यश आले आहे.
Calangute police Pardhi gang arrest
Calangute police Pardhi gang arrestDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: कळंगुट येथील एका आलिशान व्हिलामध्ये तोंडाला पट्टी बांधून घुसलेल्या आणि रहिवाशांना मारहाण करून रोख रक्कम लुटणाऱ्या आंतरराज्य ‘पारधी गँग’च्या मुसक्या आवळण्यात कळंगुट पोलिसांना यश आले आहे.

मध्य प्रदेशातील दुर्गम आणि जंगली भागात स्थानिक पोलिसांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध धाडसी मोहीम राबवून पोलिसांनी या कुख्यात टोळीतील तिघांना अटक केली असून, त्यांना ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले आहे. ९ ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेचारच्या सुमारास कळंगुट-पोरबोवाडो येथील ''ऑर्चर्ड व्हिला''मधील व्हिला क्र. ३७ मध्ये चार अज्ञात व्यक्तींनी स्वयंपाकघराची खिडकी तोडून आत प्रवेश केला होता. सर्वांचे चेहरे झाकलेले होते. त्यांच्या हातात स्क्रू ड्रायव्हर, चाकू आणि गोफण (गलोल) ही शस्त्रे होती. त्यांनी घरातील रहिवाशांना शस्त्रांचा धाक दाखवून मारहाण केली आणि मोठी रोकड लंपास करून पोबारा केला होता. याप्रकरणी कळंगुट पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३०९(४) सह ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला होता.

Calangute police Pardhi gang arrest
Goa Crime: ऐन सणासुदीत राज्यात घरफोड्या अन् सायबर फसवणुकीचे सत्र! तोरसे, दवर्लीत चोरट्यांचा धुमाकूळ; बँकेला 75 लाखांचा चुना

दरम्यान, अत्यंत आव्हानात्मक अशा मध्य प्रदेशातील ग्रामीण व दुर्गम भागात जाऊन ही धाडसी कारवाई पूर्ण करणाऱ्या पोलिस पथकाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले आहे.

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासावर भर

गुन्ह्याची गंभीरता ओळखून कळंगुट (Calangute) पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे या गुन्ह्यात मध्य प्रदेशातील टोळीचा हात असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचे आंतरराज्य स्वरूप लक्षात घेऊन पोलिस उपनिरीक्षक राजाराम बागकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तातडीने मध्य प्रदेशात रवाना केले.

अन्य काही गुन्ह्यांचाही आता लागणार छडा

आरोपींना अटक करून त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केले. तेथून ट्रान्झिट रिमांड मिळवून पोलिस पथक तिन्ही संशयितांना घेऊन गोव्यात परतले. ही टोळी देशातील विविध राज्यांत संघटितपणे जबरी घरफोड्या व दरोडे टाकणारी कुख्यात ‘पारधी टोळी’ म्हणून ओळखली जाते. आता पोलिस कोठडीत त्यांची कसून चौकशी करून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे जप्त करणे, चोरीची रोकड हस्तगत करणे आणि फरार चौथ्या साथीदाराचा शोध घेणे सुरू आहे.

Calangute police Pardhi gang arrest
Goa Politics: निंबाळकरांची 'ती' पोस्ट काही तासांत डिलीट; सरदेसाईंवरील टीकेनंतर राजकीय चर्चेला उधाण, 'गोवा फर्स्ट'वर निशाणा

दुर्गम जंगलात थरारक कारवाई

मध्य प्रदेश पोलिसांशी समन्वय साधत कळंगुटच्या पथकाने मुख्य संशयित हरिचंद रतनलाल मोंगिया आदिवासी (वय ३७ वर्षे, रा. चितोरा, सतानवाडा, जि. शिवपुरी, म.प्र.) याला शिताफीने ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यातील इतर साथीदारांची नावे उघड केली. पोलिसांनी मंगल मोंगिया (वय ४५ वर्षे) आणि त्याचा मुलगा अरुण मोंगिया (वय १८, दोघेही रा. आश्रम बैराड, चितोरा, जि. शिवपुरी, म.प्र.) या दोघांनाही बेड्या ठोकल्या. संशयितांनी दराेड्यात सहभाग असल्याची कबुली दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.