Sunil Chhetri | Indian Football Team X/IndianFootball
क्रीडा

AFC Asian Cup: भारतीय संघ पाचव्यांदा खेळणार स्पर्धा! कसे आहे सुनील छेत्रीच्या टीम इंडियाचे वेळापत्रक

Indian Football Team: भारतीय फुटबॉल संघ पाचव्यांदाच एएफसी एशियन कप स्पर्धा खेळताना दिसणार आहे. कधी आणि कुठे पाहाणार सामने जाणून घ्या.

Pranali Kodre

AFC Asian Cup 2023, Team India matches schedule:

भारतीय फुटबॉल संघ सध्या आशियाई क्षेत्रात अंडरडॉग म्हणून ओळखला जातो. सध्य भारतीय संघ एएफसी आशियाई कप 2024 स्पर्धेची तयारी करत आहे. कतारला होत असलेल्या या स्पर्धेचे यंदाचे 18 वे पर्व आहे.

भारतीय संघ या स्पर्धेत पाचव्यांदाच सहभागी होत आहे. भारतीय संघ या स्पर्धेत सर्वात पहिल्यांदाच 1964 साली सहभागी झाला होता.त्यावेळी केवळ चार संघ स्पर्धेत सहभागी होते. भारतीय संघ त्यावेळी उपविजेता राहिला होता. मात्र, त्यानंतर भारताला ही स्पर्धा पुन्हा खेळण्यासाठी 20 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली.

भारताने 1984 साली दुसऱ्यांदा ही स्पर्धा खेळली. भारताला या स्पर्धेत फक्त इराणविरुद्ध सामना बरोबरीत राखता आला, बाकी सर्व सामने भारतीय संघ पराभूत झाला. 2011 मध्ये भारतीय संघ तिसऱ्यांदाच ही स्पर्धा खेळला, ज्यातही सर्व सामने पराभूत झाला.

2019 साली भारतीय संघ चौथ्यांदा या स्पर्धेत सहभागी झाला. भारताने थायलंडला हरवलेही. या वेळी भारताची उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश थोडक्यात हुकला.

आता यंदा पुन्हा भारतीय संघ पाचव्यांदा ही स्पर्धा खेळत आहे. यंदाच्या स्पर्धेत 24 संघ सहभागी झाले असून या संघांना साखळी फेरीसाठी चार-चारच्या सहा गटात विभागण्यात आले आहे.

सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ बी गटात असून या गटात भारतासह ऑस्ट्रेलिया, उझबेकीस्तान आणि सिरिया हे संघ आहेत. दरम्यान, या तिन्ही संघांपेक्षा भारताची क्रमवारी खाली आहे.

भारताचा पहिला सामना शनिवारी (13 जानेवारी) ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तसेच दुसरा सामना 18 जानेवारीला उझबेकीस्तानविरुद्ध होईल, तर तिसरा साखळी फेरीतील सामना सिरियाविरुद्ध 23 जानेवारीला होणार आहे.

दरम्यान, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ थेट उपउपांत्यपूर्व (राऊंड ऑफ 16) फेरीसाठी पात्र ठरतील. तसेच तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघांचा एक वेगळा ग्रुप केला जाईल. त्यातून पहिले चार संघ उपउपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील.

यानंतर 16 संघात बाद फेरीला सुरुवात होईल. उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत होणाऱ्या संघांचे आव्हान संपेल, तर विजय मिळवणारे संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामना पार पडेल.

या स्पर्धेतील भारताचे सामने टीव्हीवर स्पोर्ट्स 18 चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहेत, तर जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवर ऑनलाईन स्ट्रिमिंग होणार आहे.

भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक

  • 13 जानेवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (वेळ - संध्या. 5 वाजता)

  • 18 जानेवारी - भारत विरुद्ध उझबिकिस्तान (वेळ - रा. 8 वाजता)

  • 23 जानेवारी - सिरिया विरुद्ध भारत (वेळ - संध्या. 5 वाजता)

भारतीय फुटबॉल संघ -

  • गोलकिपर - अमरिंदर सिंग, गुरप्रीत सिंग संधू, विशाल कैथ

  • डिफेंडर - आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, निखिल पुजारी, प्रीतम कोटल, राहुल भेके, संदेश झिंगन, सुभाषीष बोस

  • मिडफिल्डर - अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, दीपक टांगरी, लालेंगमाविया राल्टे, लिस्टन कोलाको, नौरेम महेश सिंग, सहल अब्दुल समद, सुरेश सिंग वांगजाम, उदांता सिंग

  • फॉरवर्ड - इशान पंडिता, लल्लियांझुआला छांगटे, मनवीर सिंग, राहुल कन्नोली प्रवीण, सुनील छेत्री, विक्रम प्रताप सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT