Abhishek Sharma Shiva Celebration  Dainik Gomantak
क्रीडा

Abhishek Sharma Shiva Celebration: 'प्लेयर ऑफ द सिरीज' ठरल्यानंतर अभिषेक शर्माचा मोठा खुलासा, सेंच्युरीनंतरच्या 'शिव सेलिब्रेशन'विषयी स्पष्टच सांगितलं; म्हणाला...

Abhishek Sharma Shiva Celebration: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात आपल्या विस्फोटक फलंदाजीने गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली.

Manish Jadhav

Abhishek Sharma Shiva Celebration: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात आपल्या विस्फोटक फलंदाजीने गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. 30 चेंडूंत तुफानी शतक झळकावून त्याने क्रिकेट जगतात नवा इतिहास रचला. अभिषेकने या सामन्यात 34 चेंडूंत 108 धावांची थरारक खेळी खेळली. कसोटी खेळणाऱ्या देशांमधील फलंदाजांमध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा जागतिक विक्रम आता त्याच्या नावावर नोंदवला गेला.

यापूर्वी, हा विक्रम न्यूझीलंडच्या फिन ॲलेनच्या (33 चेंडू) नावावर होता. परंतु, या ऐतिहासिक शतकापेक्षाही अधिक चर्चा रंगली ती अभिषेकच्या शतकानंतरच्या मैदानातील अनोख्या सेलिब्रेशनची. शतक पूर्ण करताच अभिषेक शर्माने बॅट खाली ठेवून मैदानावरच ध्यानाच्या (मेडिटेशन) मुद्रेत बसून 'ओम नमः शिवाय'चा जप करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी त्याच्या या शांत आणि भक्तिमय शैलीला 'शिव सेलिब्रेशन' असे नाव दिले. सामना संपल्यानंतर प्रसारकांशी बोलताना अभिषेकने स्वतः या सेलिब्रेशनमागील खास रहस्य उलगडले.

तो म्हणाला की, गेली 6 महिने ते 1 वर्ष मी नियमितपणे ध्यान आणि मेडिटेशन करत आहे. संपूर्ण वर्षात सातत्याने क्रिकेट खेळताना खेळाडूच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. अशावेळी मनाची एकाग्रता आणि शांतता टिकवून ठेवणे खूप गरजेचे असते. ध्यानामुळे मला मानसिक स्थिरता मिळण्यास प्रचंड मदत झाली.

अभिषेक पुढे म्हणाला की, माझ्या या सेलिब्रेशनला पाहून जर इतर कोणत्याही तरुण खेळाडूला ध्यानाचे महत्त्व पटले आणि त्याला मानसिक स्थिरतेसाठी मदत झाली, तर तोच या सेलिब्रेशनचा खरा उद्देश असेल. संपूर्ण मालिकेत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांवर हुकूमत गाजवणारा अभिषेक शर्मा या मालिकेचा खरा शिल्पकार ठरला. 3 सामन्यांत 76.33 च्या सरासरीने आणि 269.41च्या स्ट्राइक रेटने तब्बल 229 धावा फटकावून त्याने 'प्लेयर ऑफ द सिरीज'चा बहुमान पटकावला.

आपल्या फलंदाजीच्या शैलीबद्दल बोलताना त्याने स्पष्ट केले की, मला स्वतःला कोणत्याही एका चौकटीत किंवा सीमेत बांधून ठेवायचे नाही. बॉल बघायचा आणि जोरदार फटका मारायचा, हा माझा अगदी सोपा आणि स्पष्ट दृष्टिकोन आहे. मैदानावर जाऊन मनमोकळेपणाने खेळणे हीच माझी खरी ताकद आहे आणि आगामी काळातही मी याच आक्रमक पद्धतीने भारतीय संघासाठी खेळत राहीन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: काँग्रेसच्या आंदोलनात जोरदार राडा! महिला नेत्यांमध्ये आधी बाचाबाची, नंतर एकमेकींना मारल्या कानशिलात; व्हिडिओ व्हायरल

Nana Patekar: नाना पाटेकर आणि गोव्याचं अनोखं नातं! केवळ घर नव्हे, तर माणसांशीही जोडले होते ऋणानुबंध

संपादकीय: रंग त्याचा वेगळा...

Accident News: सोलर पार्कचा रस्ता बनला मृत्यूचा सापळा! ट्रेलर आणि बोलेरोची जोरदार टक्कर; 7 जणांचा जागीच मृत्यू

कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी! 'Kia Carnival'वर तब्बल 1.70 लाखांपर्यंत डिस्काउंट; एक्सचेंज, स्क्रॅपेज ऑफरमधूनही होणार मोठी बचत

SCROLL FOR NEXT