Abhishek Sharma and ishan kishan Dainik Gomantak
क्रीडा

ICC Ranking मध्ये मोठी उलथापालथ! इशान किशनला मागे टाकत अभिषेक शर्मा टी-20चा नवा किंग; पटकावले अव्वल स्थान

Abhishek Sharma becomes No 1 T20 Batsman: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या टी-20 क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली असून जबरदस्त कामगिरी जोरावर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचला.

Manish Jadhav

Abhishek Sharma ICC t20 Rankings Number One Batsman: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ताज्या टी-20 क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली असून जबरदस्त कामगिरी जोरावर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचला. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेकने केलेल्या तुफानी शतकाच्या जोरावर त्याने इशान किशनकडून नंबर-1चा ताज हिसकावून घेतला. इशान किशन गेल्या काही काळापासून टी-20 क्रमवारीत शीर्षस्थानी विराजमान होता, परंतु आता अभिषेक शर्मा टी-20 इंटरनॅशनलचा नवा किंग बनला.

गेल्या काही वर्षांत अभिषेकने टी-20 फॉरमॅटमध्ये अनेक मोठे करिष्मे केले आहेत, ज्याचे फलित त्याला या रँकिंगमधून मिळाले. याशिवाय कसोटी क्रमवारीतही मोठी उलथापालथ झाली असून, दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यानसेनने भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला मागे टाकत इतिहास रचला.

याआधीही अभिषेक टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत नंबर-1 खेळाडू राहिला. तथापि, टी-20 विश्वचषकात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती, ज्यामुळे त्याला मोठा रँकिंग फटका बसला होता आणि पाकिस्तानचा साहिबजादा फरहान अव्वल स्थानी पोहोचला होता. मात्र, अभिषेकला पुन्हा आपले शीर्ष स्थान मिळवण्यासाठी फार प्रतीक्षा करावी लागली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात अभिषेकने केवळ 38 चेंडूत 113 धावांची अभूतपूर्व आणि आक्रमक खेळी खेळली.

या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने (India) 199 धावांचे लक्ष्य अवघ्या 13.2 ओव्हरमध्ये चार गडी गमावून लीलया पार केले. याच विक्रमी खेळीमुळे अभिषेक पुन्हा एकदा क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला. दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धचे दोन सामने खेळू न शकलेला इशान किशन दोन अंकांनी घसरुन तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला, तर पाकिस्तानचा साहिबजादा फरहान दुसऱ्या स्थानी कायम आहे.

दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यानसेनने सर्व फॉरमॅटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून आपल्या खेळाने सर्वांना प्रभावित केले. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्याने अप्रतिम कामगिरी केली. या दमदार कामगिरीचे इनाम म्हणून यानसेनने भारताच्या अनुभवी रवींद्र जडेजाला मागे टाकत कसोटी क्रिकेटचा नंबर-1 अष्टपैलू खेळाडू होण्याचा बहुमान मिळवला. याशिवाय, कसोटी फॉरमॅटमध्ये तो जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज म्हणूनही प्रस्थापित झाला. क्रिकेट विश्वातील या ताज्या बदलांमुळे खेळाडूंच्या कामगिरीची जोरदार चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: दिवाळीपूर्वी मोदी सरकारची मोठी भेट! सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत चार बडे निर्णय

Train Accident: दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर जोरदार धडक, 46 प्रवाशांचा जागीच मृत्यू; अनेकजण जखमी VIDEO

FD Maturity Rules: मुदतपूर्तीनंतर एफडीचे पैसे काढले नाहीत तर काय होते? जाणून घ्या रिझर्व्ह बँकेचा मोठा नियम

Nigeria Crime News: जीव वाचवण्यासाठी लोकांनी नदीत घेतल्या उड्या, बंदूकधाऱ्यांचा हैदोस! नायजेरियातील भीषण हल्ल्यात 62 जणांचा मृत्यू; हजारो बेघर

Goa Agriculture News: डिचोलीत भातकापणीला वेग; अवकाळी पावसामुळे यंदा उत्पादनात 50 टक्के घट होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT