Abhimanyu Mishra Dainik Gomantak
क्रीडा

जगातील सर्वात युवा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान अभिमन्यूच्या नावावर

जगातील सर्वात युवा ग्रॅंडमास्टर (Grandmaster) होण्याचा मान मिळवला आहे. ग्रॅंडमास्टर सर्जी कार्याकिन (Sergey Karyakin) यांचा गेली 19 वर्षे अबाधित असलेला अभिमन्यूने (Abhimanyu) विक्रम मोडला.

दैनिक गोमन्तक

अमेरिकास्थित (America) भारताचा बुध्दीबळपटू अभिमन्यू मिश्रा (Abhimanyu Mishra) याने बुधवारी हंगेरीमधील (Hungary) बुडापेस्ट (Budapest) येथे ग्रॅंडमास्टरसाठीचा (Grandmaster) तिसरा टप्पा पार करत असताना जगातील सर्वात युवा ग्रॅंडमास्टर होण्याचा मान मिळवला आहे. ग्रॅंडमास्टर सर्जी कार्याकिन (Sergey Karyakin) यांचा गेली 19 वर्षे अबाधित असलेला अभिमन्यूने विक्रम मोडला. 12 ऑगस्ट 2002 मध्ये सर्जी कार्यकिन यांनी 12 वर्षे आणि सात महिन्यांचा असताना ग्रॅंडमास्टरचा बहुमान मिळवला होता. 5 फेब्रुवारी 2005 मध्ये जन्मलेल्या अभिमन्यूने 12 वर्षे, चार महिने आणि 25 दिवसांचा असताना ग्रॅंडमास्टर हा किताब आपल्या नावावर केला असल्याचे 'चेसडॉटकॉम' या संकेतस्थळाने सांगितले आहे.

अमेरिकेतील न्यू जर्सी (New Jersey) मध्ये राहत असलेल्या 12 वर्षीय अभिमन्यूने आंतरराष्ट्रीय मास्टरपासून ते थेट ग्रॅंडमास्टर किताब मिळेपर्यंत झेप घेतली आहे. ग्रॅंडमास्टर किताबसाठीचा 2500 एलो रेटिंगगचा टप्पा त्याने या स्पर्धेतून पार केला. बडापेस्ट येथे काही महिने अभिमन्यूने वास्तव्य करत सलग स्पर्धामध्ये भाग घेतला. त्याने या स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करत ग्रॅंमास्टरचा किताब आणि विक्रमाची नोंद केली आहे.

सर्जी कार्यकिनचा विक्रम 19 वर्षांनी अभिमन्यूने मोडला

कोरोना महामारीमुळे (Covid 19) 14 महिने बुध्दीबळ स्थगित होते. परंतु या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याला मी चेकमेट करण्यात मला यश आले. आता विश्वषकात चमक दाखवण्यासाठी उत्सुक आहे.

अभिमन्यू मिश्रा

अभिमन्यूने हा टप्पा गाठल्याबद्दल त्याचे अभिनंदन. त्याची मेहनत मी स्वत: पाहत होतो. त्याने अनेक गोष्टींचा त्याग केल्याबद्दल अभिमन्यूच्या वडिलांनाही त्याचे संपूर्ण श्रेय देता येईल.

अरुण प्रसाद, प्रशिक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: तांत्रिक अडचणीमुळे फ्लाय91 पुणे-गोवा सकाळच्या विमान उड्डाणाला विलंब

Goa Assembly: परराज्यातील दुचाकींची राज्यात नोंदणी व्हावी! दिलायला लोबोंची मागणी; टॅक्सी व्यवसाय संरक्षित करा असे आवाहन

GIDC:‘आयडीसी’च्या संचालकांवर गुन्हे नोंदवा! फेरेरांची मागणी; वित्तीय शिस्त न पाळल्याचा ठेवला ठपका

Ferry Boat Repair: फेरीबोटींवर 35 कोटींपेक्षा अधिक खर्च! आकडेवारीत विसंगती असल्याचा दावा; युरी-फळदेसाई यांच्यात जुंपली

Goa Politics: खरी कुजबुज; गोव्यातील ठेकेदार सुटले कसे?

SCROLL FOR NEXT