एबीसी हरमल संघ  Dainik Gomantak
क्रीडा

दाय ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत एबीसी हरमल संघ विजेता

विजेत्या एबीसी संघाला रोख 10 हजार रूपये व दाय स्मृती चषक प्रदान करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

चोनसाई: पार्से येथील बॉक्सर बॉईज स्पोर्ट्स क्लबतर्फे (Boxer Boys Sports Club) आजुचा ओहळ मैदानावर पार्सेचे माजी सरपंच तथा स्वातंत्र्य सैनिक सहदेव नाईक यांच्या स्मरणार्थ फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 5 खेळाडूंच्या दाय ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत एबीसी हरमल (ABC Arambol) संघाला विजेते पद प्राप्त झाले. आणि उडो बीच बॉईज संघाला उपविजेते पद प्राप्त झाले आहे. (ABC Arambol team winners in Day Trophy football tournament in Goa)

विजेत्या एबीसी संघाला रोख 10 हजार रूपये व दाय स्मृती चषक प्रदान करण्यात आले आहे. उपविजेत्या उदो बीच बॉईज शिवोली संघाला ६ हजार रूपये व दाय स्मृती चषक प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय अंतिम सामन्यातील म्यान ऑफ द म्याच बाबू (ABC हरमल ) बेस्ट स्ट्रायकर सुप्रियान रोड्रिगास ( ABC हरमल ) बेस्ट परफॉर्मर साईदीप ( उदो बीच बॉईज जन) याना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.

बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मांद्रे मतदार संघाचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे, खास निमंत्रित पाहुणे म्हणून अर्जुन अवार्डी ब्रुनो कुतीन्हो उपस्थित होते. याशिवाय पार्सेच्या सरपंच सौ.प्रगती सोपटे, पंच सौ.ममता सातर्डेकर ,रिटायर एअर फोर्स ऑफिसर कॉनरड फर्नांडिस ,रिटायर नेवी ऑफिसर रत्नदीप गोलतेकर,अशोक नाईक,वामन नाईक,अमीर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

पार्से- चोनसाई येथील बॉक्सर बॉईज आयोजित 5 खेळाडूंच्या फुटबॉल स्पर्धेत अंतिम विजेता ठरलेल्या एबीसी हरमल संघाला प्रमुख पाहुणे आमदार दयानंद सोपटे, अर्जुन अवार्ड विजेते खेळाडू ब्रुनो कुतीन्हो , पार्सेचे सरपंच सौ.प्रगती सोपटे यांनी दाय चषक आणि रोख रक्कम प्रदान केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT