AB de Villiers | Virat Kohli - Anushka Sharma Instagram
क्रीडा

Virat - Anushka: विरुष्काच्या घरी पुन्हा हलणार पाळणा, जिगरी दोस्त डिविलियर्सनेच उघडले मोठे रहस्य

Ab de Villiers on Virat Kohli: विराटने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून माघार घेण्याचे कारण त्याचा मित्र आणि माजी क्रिकेटर एबी डिविलियर्सने सांगितले आहे.

Pranali Kodre

Ab de Villiers reveals Virat Kohli Anushka Sharma expecting second child:

भारत विरुद्ध इंग्लंड क्रिकेट संघांमध्ये सध्या शुक्रवारपासून (2 फेब्रुवारी) कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरू झाला आहे. मात्र पाच सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यातून भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने माघार घेतली असल्याने तो उपलब्ध नाही.

त्याने ही मालिका सुरू होण्यापूर्वीच बीसीसीआय आणि भारतीय संघव्यवस्थापनाशी चर्चा करून विश्रांतीची विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली. याबद्दल माहिती देताना बीसीसीआयने सांगितले होते की त्याने वैयक्तिक कारणाने विश्रांती घेतली आहे.

त्याच्या या निर्णयाबद्दल तर्कवितर्क चाहत्यांकडून किंवा मीडियाकडून लावले जाऊ नयेत. त्यामुळे नक्की त्याने कशामुळे कसोटी सामन्यांमधून माघार घेतली याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम होता.

अखेर विराटचा मित्र आणि दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सनेच याबाबत मोठा खुलासा केला आहे.

डिविलियर्सने सांगितले की विराट ठिक असून सध्या त्याच्या कुटुंबाबरोबर आहे. इतकेच नाही तर गेल्या अनेक दिवसांपासून विराट आणि त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची चर्चा होती, त्यावरही आता डिविलियर्सने शिक्कामोर्तब केले आहे.

शनिवारी (३ फेब्रुवारी) डिविलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनेलवरील शोमध्ये सांगितले की 'मला फक्त इतके माहित आहे की तो ठिक आहे. तो त्याच्या कुटुंबासमवेत थोडा वेळ घालवत आहे. त्याचमुळे तो पहिल्या दोन कसोटी सामन्यांत खेळला नाही. मी यापेक्षा अधिक काही खुलासा करणार नाही. मी त्याला पुन्हा मैदानात पाहाण्यासाठी उत्सुक आहे.'

याशिवाय विराटने कसोटी सामन्यांतून माघार घेतल्यानंतर डिविलियर्सने त्याची विचारपूस केल्याचेही त्याने सांगितले.

त्याचबरोबर डिविलियर्सने खुलासा केला की 'हो, त्याच्या घरी लवकरच दुसरे मुल येणार आहे. हो, हा कुटुंबासाठीचा वेळ आहे आणि काही गोष्टी त्याला महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही स्वत:शी प्रामाणिक नसाल, तर तुम्ही तुम्ही मार्ग भटकता.'

'मला वाटते कुटुंब बऱ्याच लोकांची प्राथमिकता असते. तुम्ही त्यावरून विराटला पारखू शकत नाही. हो, आपल्याला त्याची कमी भासत आहे, पण त्याने अगदी योग्य निर्णय घेतला आहे.'

दरम्यान, अद्याप भारतीय संघाच्या निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड केलेली नाही. त्यामुळे आता अखेरच्या तीन सामन्यांसाठी विराटचे पुनरामन होणार की नाही, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: इंडिया आघाडीच्या नेत्याच्या प्रचारासाठी विजय सरदेसाई महाराष्ट्रात!

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

Ranji Trophy 2024: मोहितचा 'पंजा' अन् फलंदाजांचा जलवा, गोव्यानं उडवला मिझोरामचा धुव्वा; नोंदवला सलग चौथा विजय!

SCROLL FOR NEXT