AB de Villiers IPL
क्रीडा

AB de Villiers: 'IPL 2010 नंतर मला सांगितले की...', डिविलियर्सने दिल्ली संघाबाबत केला धक्कादायक खुलासा

Pranali Kodre

AB de Villiers opened up on his stint in Delhi Daredevils:

क्रिकेटमध्ये जेव्हाही दिग्गज फलंदाजांची चर्चा होते, तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डिविलियर्सचेही नाव हमखास घेतले जाते. डिविलियर्स गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेटचे मैदान गाजवत आला आहे.

आयपीएलमध्येही तो 2008 ते 2021 दरम्यान खेळला. यातील बरीच वर्षे तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळला. अनेकांना तो पहिल्यापासून बेंगलोरकडून खेळतो, असे वाटतही असेल, मात्र खूप जणांना माहित नाही की डिविलियर्स 2008 ते 2010 दरम्यान डिविलियर्स दिल्ली डेअरडेविल्स (आताचे नाव दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळला होता.

त्यानंतर बेंगलोरने त्याला संघात घेतले. त्यामुळे 2011 ते 2021 असे 10 वर्षे तो बेंगलोर संघाकडून खेळला. दरम्यान, आता डिविलियर्सने 2011 आयपीएलच्या आधीच्या एका घटनेचा मोठा खुलासा केला आहे.

डिव्हिलियर्सने सांगितले आहे की दिल्ली संघातील काही अधिकाऱ्यांनी सांगितले होते की त्याला संघात कायम केले जाणार आहे, पण त्याला 2011 लिलावापूर्वी संघातून बाहेर करण्यात आले होते, ज्याचे त्याला आश्चर्य वाटले होते.

डिविलियर्सने त्याच्या युट्यूब चॅनेलवर सांगितले की 'जेव्हा मी 2010 च्या हंगामात खेळलो, तेव्हा मला ऑफिसमधून संपर्क करण्यात आला होता की 'यंग एबी डिविलियर्स, तुला संघात रिटेन केले जाणार आहे.' मी त्या मीटिंगमध्ये डेव्हिड वॉर्नरबरोबर बसलो होतो.'

'त्यानंतर साधारण एक-दोन आठवड्यात मला आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा मला कळाले की मला करारमुक्त करण्यात आले आहे. त्यावेळी झालेले संवाद चांगले नव्हते, पण आताच्या काळात वेगळी गोष्ट आहे, मात्र ती चांगली गोष्ट नव्हती.'

डिविलियर्सने पुढे सांगितले की 'त्यावेळी क्रिकेट कारकिर्दीबद्दल निश्चितता नव्हती, मला वाटते त्या हंगामात मी केवळ 5 सामने खेळलो होतो. त्यामुळे माझ्या मनात अनेक शंका येत होत्या.'

'मात्र, माझ्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तो हंगाम चांगला होता. मी चांगले क्रिकेट खेळत होतो आणि मी सुदैवी होतो की लिलाव झाला आणि मला आरसीबी संघाने निवडले. त्यामुळे माझे आयुष्य कायमचे बदलले. त्याबाबत माझ्या अनेक चांगल्या आठवणी आहेत.'

एबी डिविलियर्सला आयपीएल 2011 हंगामात बेंगलोरने 5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. तेव्हापासून तो बेंगलोरचा प्रमुख खेळाडू बनला. त्याने अनेकदा बेंगलोरला आपल्या फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवू दिले.

डिविलियर्सने आयपीएलमध्ये 14 हंगाम खेळताना 184 सामन्यांमध्ये 38.71 च्या सरासरीने 3 शतके आणि 40 अर्धशतकांसह 5162 धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT