T20 World Cupसाठी 10 ऑक्टोबरपर्यंत संघांना आपल्या संघात बदल करता येणार आहेत. Dainik Gomantak
क्रीडा

IPLमध्ये चमक दाखविणाऱ्या खेळाडूला अजूनही मिळू शकते T20 World Cupचे तिकीट

उद्यापासून सुरु होणारी IPL स्पर्धा म्हणजे विश्वचषकाची (World Cup) पूर्व तयारी मानली जात आहे, त्यामुळे IPL मध्ये चांगली कामगिरी केल्यास मिळू शकते भारतीय संघात स्थान

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) च्या दुसऱ्या टप्प्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. IPL नंतर लगेचच टी-20 विश्वचषक (T20 World Cup) सुरु होणार आहे. त्यातच ही IPL स्पर्धा म्हणजे विश्वचषकाची पूर्व तयारी मानली जात आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी सर्वच संघ आता कसून सराव करत आहेत. भारतीय निवड समितीने 8 सप्टेंबरला टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाच्या (Indian team) 15 सदस्यांची घोषणा केली आहे. या संघात सलामीचा फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि स्पिन गोलंदाज यजुवेंद्र चहल (Yajuvendra Chahal) यांनी निवड न झाल्याने अनेकांना अश्चर्याचा धक्का बसला आहे. पण जोवर टी-20 विश्वचषकाला सुरुवात होत नाही तोपर्यंत भारतीय संघाला आपल्या निवड केलेल्या संघात बदल करण्याची संधी आहे. 10 ऑक्टोबरपर्यंत संघांना आपल्या संघात बदल करता येणार आहेत.

दरम्यान, उद्यापासून सुरु होत असलेल्या IPL स्पर्धेत जर काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली तर त्यांना थेट टि-20 विश्वचषकाचे तिकिट मिळू शकते. त्यामुळे IPL स्पर्धा ही अनेक खेळाडूंना गेम चेंजर देखील ठरु शकते.

टि-20 विश्वचषकात भारताचा सलामीवीर शिखर धवन याला संघात संधी न मिळाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. शिखरच्या जागी ईशान किशनची निवड करण्यात आली आहे. संघात आधीच केएल राहुल आणि रिषभ पंत हे यष्टिरक्षक फलंदाज असतानाही ईशान किशनची निवड कशी काय झाली. पण संघ निवडीच्या वेळी रिषभ पंतचा बॅकअप आणि मुख्य यष्टिरक्षक म्हणून ईशान किशनची निवड झाली आहे.

अक्षर पटेलच्या निवडीवरुन देखील अश्चर्यव्यक्त होत आहे. दीपक चहरने श्रीलंका विरुध्दच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन देखील, तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाकडून चांगली गोलंदाजी केली आहे. तरी देखील त्याच्या जागी अक्षर पटेलची निवड केल्याने अनेकांनी निवड समितीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

त्याच बरोबर यजुवेंद्र चहलच्या ऐवजी आर. अश्वीनची केलेली निवड ही सर्वांसाठी सरप्राईजिंग होते. कारण यजुवेंद्र चहलने या आधी वनडे आणि टि-20 सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तर अश्वीनला इंग्लंड विरुध्दच्या कसोटी मालिकेत प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्यास संधी मिळाली नसली तरी, आधी झालेल्या मालिकांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. परंतु अश्वीनने कसोटीत चांगली कामगिरी केली असली तरी वनडे आणि टि-20 मध्ये त्याला संघात स्थानासाठी झगडावे लागत आहे. त्यात यजुवेंद्र चहल याने या दोन्ही फॉरमॅटमध्ये चमक दाखविली आहे. त्यामुळे त्याच्या जागी अश्वीनला स्थान देण्यात आल्याने पुन्हा एकदा निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

Calangute: दारुच्या नशेत टाईट पर्यटकाचा कळंगुटमध्ये राडा; नग्न होऊन रस्त्यात झोपला, टॅक्सीवर उभारला

Rashi Bhavishya 23 November 2024: नोकरीत बढतीची संधी अन् बेरोजगारांनाही दिलासा... 'या' दोन राशींच्या लोकांचा विशेष दिवस!

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

SCROLL FOR NEXT