Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2022 पूर्वीचं दिल्ली कॅपिटल्स च्या बसवर हल्ला!

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) 26 मार्चपासून सुरु होत आहे. मात्र त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) 26 मार्चपासून सुरु होत आहे. मात्र त्याआधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत दिल्ली कॅपिटल्स संघाच्या बसवर हल्ला झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 5-6 अज्ञात लोकांनी दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) बसची तोडफोड केली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चार कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचे प्रथमदर्शनी समजत आहे. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी या पक्षाच्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर एका आरोपीचा शोध सुरु आहे. आता प्रश्न असा आहे की, जर हा हल्ला मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला असेल तर तो का झाला? (A Delhi Capitals team bus has been attacked in Mumbai)

दरम्यान, आयपीएल संघांच्या बसचे कंत्राट दिल्लीस्थित कंपनीला दिल्याने मनसे कार्यकर्ते नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेच्या म्हणण्यानुसार, हे कंत्राट महाराष्ट्राच्या (Maharashtra) कंपनीला द्यायला हवे होते. याच्या निषेधार्थ या कामगारांवर तोडफोड केल्याचा आरोप आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज ठाकरे यांचा पक्ष आहे. उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरुन ते अनेकदा मुंबईतील वादांमध्ये दिसले आहेत.

दिल्ली कॅपिटल्सची मोहीम 27 मार्चपासून सुरु होणार

ब्रेबॉर्न स्टेडियमवर 27 मार्चपासून दिल्ली कॅपिटल्सची मोहीम सुरु होणार आहे. दिल्लीचा संघ आयपीएलमध्ये पाच वेळा चॅम्पियन असणाऱ्या मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि गोलंदाजी प्रशिक्षक जेम्स होप संघात सामील झाले आहेत. दिल्लीने या मोसमात अजित आगरकर आणि शेन वॉटसन यांना सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

दिल्ली कॅपिटल्सने तगडे खेळाडू विकत घेतले

दिल्ली कॅपिटल्सने 2020 मध्ये आयपीएल जिंकण्याची संधी गमावली होती. परंतु यावेळी त्यांनी अनेक दिग्गज खेळाडूंना आपल्या संघात सामिल करुन घेतले आहे. या खेळाडूंमध्ये डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, शार्दुल ठाकूर यांचा समावेश आहे. यश धुल, लुंगी एनगिडी, टिम सेफर्ट हे देखील या संघाचा भाग बनले आहेत. आता ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pisurle: विद्यार्थ्यांनी फुलविली झेंडूची फुले, पिसुर्ले सरकारी विद्यालयात 'ग्रीन वॉरिअर इको' क्लबचा स्तुत्य उपक्रम

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन' ठरणार! मिथुन, कर्कसह 'या' 4 भाग्यवान राशींना करिअरमध्ये मोठे यश, वाचा तुमचे भविष्य

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

SCROLL FOR NEXT