Cedric Jordan DaSilva and co-driver Mackwin Dias Dainik Gomantak
क्रीडा

RFC India 2023 : गोमंतकीय ड्रायव्हर जोडी रेनफॉरेस्ट चॅलेंजमध्ये अव्वल; सेड्रिक-मॅकविनला विजेतेपद

मलेशियात होणाऱ्या जागतिक आरएफसी स्पर्धेसाठी पात्रता

किशोर पेटकर

9th Rain forest Challenge India in Goa 2023 : गोमंतकीय ड्रायव्हर जोडी सेड्रिक दा सिल्वा (चालक) व मॅकविन डायस (सहचालक) जोडीने रेनफॉरेस्ट चॅलेंज (आरएफसी) (RFC India 2023) इंडिया ऑफ-रोड मोटरस्पोर्टस स्पर्धेत विजेतेपद मिळविले. राज्यातील ड्रायव्हर स्पर्धेत विजेता ठरण्याची ही पहिलीच वेळ ठरली.

गोव्यात आठडाभर चालेल्या या खडतर, आव्हानात्मक ड्रायव्हिंग स्पर्धेतील सफलतेमुळे सेड्रिक आता मलेशियात या वर्षअखेरीस होणाऱ्या जागतिक आरएफसी स्पर्धेसाठी मोफत प्रवेशिकाअंतर्गत पात्र ठरला.

सेड्रिक ४२ वर्षांचा असून मॅकविन ३८ वर्षांचा आहे. त्यांनी उत्कंठावर्धक ड्रायव्हिंगमुळे कस लागलेल्या स्पर्धेत २६०० पैकी २१०१ गुणांची कमाई करून अव्वल क्रमांक पटकावला. (off-road motorsport event)

आनंद व्ही. मंजूरन (सहचालक चेतन चेंगप्पा) याला दुसरा, तर डॉ. महंमद फाहेद (सहचालक राजीव लाल) याला केरळच्या चालकांना अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळाला. आनंदने २०१९ गुणांची, तर फाहेदने १९८२ गुणांची नोंद केली. या धाडसी मोटरस्पोर्टस स्पर्धेची यंदा भारतातील नववी आवृत्ती होती.

गोव्यात हवामान खात्याकडून पावसाचा ऑरेंज व रेड अलर्ट होता आणि जोरदार पावसात कच्च्या मार्गावर झालेली यावेळची आरएफसी स्पर्धा ड्रायव्हरच्या कौशल्याची परीक्षा पाहणारी ठरली. स्पर्धेत ड्रायव्हरसमोर एकूण २६ कठीण टप्पे पूर्ण करण्याचे लक्ष्य होते.

‘‘विजेतेपदाचे माझे दीर्घकाळापासूनचे स्वप्न प्रत्यक्षात आले आहे. ऑफ-रोडिंग ही माझी एकमेव आवड आहे. आरएफसी इंडिया स्पर्धा वगळता यापूर्वी मी देशातील सर्व प्रमुख ऑफ-रोडिंग स्पर्धा जिंकल्या होत्या. हुकलेला करंडक प्राप्त झाल्यामुळे इच्छापूर्ती झाली असून जग जिंकल्याची भावना आहे,’’ अशी प्रतिक्रिया सेड्रिकने विजेतेपदाच्या करंडकासह दिली.

‘‘वर्षागणिक स्पर्धेतील चढाओढ खडतर बनत चालली आहे. स्पर्धेच्या अंतिमपूर्व फेरीपर्यंत अटीतटीचे ड्रायव्हिंग झाले व त्यामुळे चुरस वाढली. इतर मोटरस्पोर्टस स्पर्धांच्या तुलनेत आरएफसी इंडिया स्पर्धेतील गुणांकन पद्धत वेगळी आहे. एखादा टप्पा हुकला असता, तर मागील ड्रायव्हरने आम्हाला मागे टाकले असते. अखेरीस अथक परिश्रम सार्थकी लागले,’’ असे सेड्रिक म्हणाला.

गोव्यात आरएफसी वाहनांचे तंत्रज्ञ नसल्याने वाहन दुरुस्तीसाठी पंजाबला पाठवावे लागत असे आणि ते दुरुस्त होऊन परत येईपर्यंत बराच कालावधी उलटलेला असायचा. त्यामुळे सरावासाठीचा वेळ वाया जात असे. यावर्षी वाहन नियोजित वेळेत उपलब्ध झाले आणि त्यामुळे तयारी चांगली झाली, वाहनाला योग्यप्रकारे समजून घेता आले, असेही सेड्रिकने स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: नोकऱ्यांचा चोरबाजार! 'त्या' ऑडिओतील मोन्सेरात कोण? महसूलमंत्री संतापले, सखोल चौकशीची केली मागणी

Goa Today's News Live: मंत्री बाबूश यांना माझा पाठिंबा; सर्वच घोटळ्यांची व्हावी न्यायालयीन चौकशी - उत्पल पर्रीकर

Jonty Rhodes: राहण्यासाठी गोवा का निवडला? पर्यटन वादात दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेटरने दिलेल्या उत्तराने मने जिंकली

PWD Goa: फक्त एका एक्लिवर मिळणार पिण्याच्या पाण्याचे सर्व अपडेट्स; PDW ची गोवेकरांसाठी नवीन उपाययोजना

Sreejita De: जर्मन नवरा, बंगाली नवरी! प्रसिद्ध अभिनेत्रीने गोव्यात प्रियकरासोबत दुसऱ्यांदा केले लग्न; पाहा Photo

SCROLL FOR NEXT