Rani Rampal  Dainik Gomantak
क्रीडा

37th National Games : नवोदितांसाठी संघातील ज्येष्ठ खेळाडू प्रेरणास्त्रोत : राणी रामपाल

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सुवर्ण राखणे हेच हरियानाचे उद्दिष्ट

गोमन्तक डिजिटल टीम

37th National Games : पणजी, भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार, आता राष्ट्रीय १७ वर्षांखालील मुलींच्या संघाची प्रशिक्षक असलेली राणी रामपाल चौथ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी झाली आहे.

यावेळी नवोदित युवा हॉकीपटूंसाठी प्रेरणास्त्रोत बनताना हरियानाचे सुवर्णपदक राखण्याचे उद्दिष्ट या २८ वर्षीय दिग्गज हॉकीपटूने बाळगले आहे.

३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील हॉकी सामने पेडे-म्हापसा येथी हॉकी स्टेडियमवर सुरू आहेत. या स्पर्धेत राणी हरियानाच्या महिला संघाचे नेतृत्व करत आहे.

पुन्हा एकदा राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याविषयी राणी म्हणाली, ‘‘जेव्हा मी नवोदित होते, तेव्हा संघातील ज्येष्ठ खेळाडू आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत होते. त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केले. सध्याच्या हरियाना महिला संघात बऱ्याचजणी नवोदीत आहेत.

त्यांना माझ्याकडून प्रेरणा मिळाली, तर भारतीय हॉकीसाठी ते माझे महत्त्वपूर्ण योगदान ठरेल. त्यामुळे मी संघाचे नेतृत्व करत आहे.

’’ राणीच्या नेतृत्वाखाली हरियानाच्या महिलांनी पहिल्या लढतीत तमिळनाडूचा ८-० असा धुव्वा उडविला. तिच्याच नेतृत्वाखाली गतवर्षी गुजरातमधील ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत हरियानाने महिला हॉकीचे विजेतेपद पटकावले होते..

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेने उघडले द्वारराणी रामपाल २००७ साली गुवाहाटी येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वप्रथम खेळली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. भारतातर्फे २५० हून जास्त आंतरराष्‍ट्रीय हॉकी सामने खेळताना राणीने १२० गोल नोंदविले. तिने राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही केले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला माझ्या ह्रदयात खास स्थान आहे. २००७ साली मी पहिल्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतला आणि त्या स्पर्धेतील लक्षवेधक कामगिरीची दखल घेऊन माझी राष्ट्रीय शिबिरात निवड झाली.

एकंदरीत भारताच्या महिला संघाचे द्वार मला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळेच खुले झाले. त्यामुळेच या स्पर्धेत खेळताना प्रेरित असते.

प्रत्येक क्रीडापटूसाठी देशाचे प्रतिनिधित्व करणे गौरवास्पद असते, पण ज्या व्यासपीठावरून यशोगाथेला सुरवात झाली त्या राज्याचे प्रतिनिधित्व नेहमीच स्मरणात ठेवायला हवे, असे राणी म्हणाली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT