National Game 2023  Dainik Gomantak
क्रीडा

National Game Goa 2023 : मिनी गोल्फमध्ये गोव्याला पदार्पणात सुवर्ण

ब्राँझपदकाचीही कमाई ः नवा खेळ गोव्यात रुजविण्याचे संघटनेचे ध्येय

गोमन्तक डिजिटल टीम

National Game 2023 : पणजी, मिनी गोल्फ या खेळाचा ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऐनवेळी समावेश झाला, पण अखेरीस नवा क्रीडाप्रकार गोव्यासाठी पदक विजेता ठरला. मिरामार समुद्रकिनारी गोल्फ खेळाची छोटी आवृत्ती असलेल्या या नाविन्यपूर्ण खेळात यजमानांना एक सुवर्ण व एक ब्राँझ अशी एकूण दोन पदके मिळाली.

कुंभारजुवे येथील गोविंदराज तारी याने पुरुषांच्या एकेरीत सुवर्णपदक जिंकले, तर मिश्र दुहेरीत सम्राट तारी व प्रज्ञा गोसावी या गोव्याच्या जोडीला ब्राँझपदक मिळाले.

राज्यात खेळ रुजविणार ः सिद्धेश नाईक

उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष तथा गोवा मिनी गोल्फ संघटनेचे अध्यक्ष सिद्धेश श्रीपाद नाईक यांनी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मिनी गोल्फ क्रीडा प्रकाराचा समावेश करणे हे चांगले पाऊल असल्याचे प्रतिपादन केले.

गोल्फ हा श्रीमंत माणसांचा खेळ मानला जातो. मात्र, मिनी गोल्फ सर्वसामान्यांना खेळता येईल. यामुळे गोव्यातील नवे खेळाडू आणि विद्यार्थी आकर्षित होतील. गोव्यातील नागरिकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाची ओळख व्हावी, यासाठी संघटना काम करेल, असे ते म्हणाले.

गोव्यात मिनी गोल्फ संघटना स्थापन करण्यात आली असून, या माध्यमातून आम्ही या खेळाचे प्रशिक्षण व जनजागृती करणार आहोत. जेव्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा होतात, तेव्हा गोव्याच्या लोकांना अशा स्पर्धांचा अनुभव मिळावा यासाठी आम्ही काम करू, असे ते म्हणाले.

गोव्यातील खेळाडूंना क्रीडा स्पर्धेत आपली प्रतिभा दाखविण्याची चांगली संधी आहे, असे सांगून नाईक यांनी राज्यातील विविध संघटनांना पाठिंबा दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व क्रीडामंत्री गोविंद गावडे यांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT