Mithun Manjunath Dainik Gomantak
क्रीडा

37th National Games: आशियाई पदक विजेता मिथुन मंजुनाथ पराभूत

महिला एकेरीत गतविजेतीला पराभवाचा धक्का

किशोर पेटकर

राष्ट्रीय बॅडमिंटन एकेरी विजेता, हांग् चौऊ आशियाई स्पर्धेतील सांघिक रौप्यपदकप्राप्त कर्नाटकच्या मिथुन मंजुनाथ याचे ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पुरुष बॅडमिंटनमधील आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले.

तेलंगणाच्या एम. थरुण याने सोमवारी एक तास व सात मिनिटांच्या झुंजीनंतर १२-२१, २१-१४, २२-२० असा सनसनाटी विजय नोंदविला.

स्पर्धा ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सुरू आहे. यावर्षी राष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीत विजेता ठरलेला २५ वर्षीय मिथुन गोव्यातील स्पर्धेत द्वितीय मानांकित होता, तर थरुण याला चौथे मानांकन आहे.

गतवर्षी गुजरातमधील ३६व्या राष्ट्रीय स्पर्धेत मिथुन उपविजेता ठरला होता. पुरुषांच्या दुसऱ्या एकेरीत राष्ट्रीय स्पर्धेतील माजी विजेता मध्य प्रदेशच्या तीस वर्षीय सौरभ वर्मा याने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकित हर्षील दाणी याला ५७ मिनिटांत १९-२१, २१-१४, २१-१७ असे हरविले.

सौरभ याने २०११ साली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सांघिक ब्राँझ, तर २०१५ साली पुरुष एकेरीतील सुवर्णपदक पटकावले होते. तो तीन वेळचा माजी राष्ट्रीय एकेरी विजेता आहे.

गतविजेती आकर्षी स्पर्धेबाहेर

गतविजेती छत्तीसगडची आकर्षी कश्यप महिला एकेरीतील आव्हान सोमवारी उपांत्य फेरीत संपुष्टात आले. तिला हरियानाची चौथी मानांकित राष्ट्रीय विजेती अनुपमा उपाध्याय हिच्याकडून ३९ मिनिटांत दोन गेममध्ये २१-१३, २१-१७ अशी हार पत्करावी लागली.

महिला एकेरीत सुवर्णपदकासाठी अनुपमा हिच्यासमोर उत्तराखंडच्या अदिती भट हिचे आव्हान असेल. अदितीने तेलंगणाच्या एम. मेघना रेड्डी हिला चुरशीची ठरलेल्या ५१ मिनिटातील लढतीत ७-२१, २४-२२, २१-१६ असे हरविले.

जागतिक क्रमवारीतील माजी ज्युनियर अव्वल खेळाडू १८ वर्षीय अनुपमाने पहिल्या गेममध्ये सलग ११ गुण जिंकून आकर्षीवर वर्चस्व राखले. जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नास खेळाडूंत असलेल्या २२ वर्षीय आकर्षीला अनुपमाचा झंझावात परतावून लावणे कठीण ठरले.

गतवर्षी गुजरातमध्ये झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आकर्षीने सुवर्णपदक जिंकले होते. अनुपमाने यावर्षी राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपद मिळविले आहे. तिला आता आणखी एका जेतेपदाची संधी असेल.

अन्य उपांत्य निकाल

महिला दुहेरी: शिखा गौतम व के. अश्विनी भट (कर्नाटक) वि. वि. काव्या गुप्ता व दीपशिखा सिंग (दिल्ली) २१-१८, २४-२२. सिमरन सिंघी व रितिका ठाकर (महाराष्ट्र) वि. वि. आर. अरुलबाला व व्ही. एस. वर्षिनी (तमिळनाडू, २१-१६, २१-१२.

पुरुष दुहेरी: एच. व्ही. नितीन व के. पृथ्वी रॉय (कर्नाटक) वि. वि. दीप रंभिया व अक्षण शेट्टी (महाराष्ट्र) २१-१७, २१-१४. हरिहरन अम्साकरुणन व आर. रुबन कुमार (तमिळनाडू) वि. वि. एस, प्रकाश राज व वैभव (कर्नाटक) २१-१३, २१-१४.

मिश्र दुहेरी: गौस शेख व डी. पूजा (आंध्र) वि. वि. नितीनकुमार व कनिका कंवल (दिल्ली) २१-१८, २१-१४. नवनीत बोक्का व मनीषा प्रसाद (तेलंगण) वि. वि. सूरज गोआला व मनाली बोरा (आसाम) २१-१४, २१-१५.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: महाराष्ट्रात मिळालेलं यश अभूतपूर्व सुलक्षणा सावंत यांची प्रतिक्रिया; जाणून घ्या गोव्यातील इतर घडामोडी

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT