37th National Game Goa 2023 Dainik Gomantak
क्रीडा

National Game Goa 2023: सरकारी नोकर भरतीत मिळणार सरसकट 4 टक्के क्रीडा आरक्षण : मुख्यमंत्र्यांची घोषणा

National Game Goa 2023: उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत क्रीडा स्पर्धेचा समारोप

गोमन्तक डिजिटल टीम

National Game Goa 2023 : पणजी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नैपुण्य दाखवणाऱ्या क्रीडापटूंसाठी सरकारच्या सर्व खात्यांत, सर्व स्तरावरील नोकऱ्यांत ४ टक्के आरक्षण ठेवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

ते ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात बोलत होते. यापूर्वी केवळ पोलिस आणि अग्निशमन दलातील नोकऱ्यांतच क्रीडापटूंना आरक्षण होते.

उपराष्ट्रपती जगदीप धनकड आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. भारतीय ऑलिपिंक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजक असलेल्या उत्तराखंडच्या क्रीडामंत्री रेखा आर्य यांच्याकडे क्रीडाध्वज सुपूर्द केला.

यावेळी सर्वाधिक सुवर्णपदके पटकावलेल्या महाराष्ट्राच्या संघाला राजा भलिंद्र सिंग फिरत्या चषकाने गौरवण्यात आले. महाराष्ट्राचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी तो चषक स्वीकारला. सर्वाधिक पदके पटकावणारे खेळाडू श्रीहरी नटराज (कर्नाटक), संयुक्ता काळे (महाराष्ट्र) यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये हा समारोप सोहळा झाला. अनंत अग्नी आणि रूपा च्यारी यांनी सूत्रसंचालन केले, तर क्रीडा सचिव श्वेतिका सचन यांनी आभार मानले.

गोवा राज्य छोटे; पण हृदय विशाल

या सोहळ्यात उपराष्ट्रपती जगदीप धनकड म्हणाले की, गोवा हे छोटे राज्य असले तरी गोमंतकीयांचे हृदय विशाल आहे. त्याचमुळे या स्पर्धांतील सर्व सहभागी चांगल्या स्‍मृती घेऊन येथून जातील, यात शंकाच नाही.

गोवा आहे तयार’ ही केवळ घोषणा नव्हती, तर त्यामागे मोठी मेहनत होती. तो जोश क्रीडामंत्री गोविंद गावडे यांच्या भाषणातून दिसून आला.

पदक आलेख वाढवा

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, राष्ट्रीय पातळीवर ५ टक्के क्रीडा आरक्षण आहे; पण गोवा हे छोटे राज्य असल्याने सध्या ४ टक्के आरक्षण दिले जाईल.

नोकरीतील आरक्षण ही क्रीडापटूंसाठी आनंदाची बाब असायला हवी. या स्पर्धेत गोव्याच्या क्रीडापटूंनी ९२ पदके पटकावली. यापुढे ते शंभरहून अधिक पदके पटकावतील.

राज्यात ३९ मैदाने करणार विकसित

राज्यात खासगी क्षेत्रातून क्रीडा विद्यापीठही उभे राहणार आहे. त्यात क्रीडाविषयक पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम असतील. क्रीडा क्षेत्र हेही करिअर घडवण्याचे क्षेत्र असू शकते, हे यामुळे सिद्ध होईल.

या स्पर्धेच्या निमित्ताने उभ्या केलेल्या क्रीडा सुविधांचा वापर करण्यात येणार आहे. ३९ क्रीडा संघटनांना ३९ मैदाने सराव करण्यासाठी उपलब्ध केली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT