26 year old man arrested for invading pitch and giving fist bumps to Kohli, Rohit Dainik Gomantak
क्रीडा

IPL पाहायला जाणं पडलं महागात, 26 वर्षीय तरुणाला अटक

तरुणाला पुणे पोलिसांनी केली अटक

दैनिक गोमन्तक

मुंबई इंडियन्स-आरसीबी सामन्यादरम्यान मैदानात घुसलेल्या 26 वर्षीय तरुणाला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माला मिठी मारली होती आणि त्याच्याविरुद्ध अनधिकृत प्रवेश आणि गोंधळ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची पोलिसांशी ही बाचाबाची झाली.

तरूणाने मैदानात प्रवेश करत सगळीकडे गोंधळ उडवून दिला. त्याला मैदानात जाण्यापासून अडवण्यासाठी तैनात पोलिसांनी अडवले असता पोलिसांना धूडकावत त्याने विराट कोहली आणि रोहित शर्माकडे धाव घेतली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी त्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, अनुज रावत आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या दमदार फलंदाजीमुळे शनिवारी येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या IPL 2022 च्या 18 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने मुंबई इंडियन्सचा (MI) सात गडी राखून पराभव केला.

IPL 2022 चा 18 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा सात गडी राखून पराभव केला. मुंबईचा या मोसमातील हा सलग चौथा पराभव आहे. या सामन्यात आरसीबीने प्रथम शानदार गोलंदाजी केली आणि त्यानंतर फलंदाजांनी दणदणीत सामना संपवला. आरसीबीने या मोसमात 4 सामन्यांपैकी 3 सामने जिंकले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: प्रदूषण मंडळाचा दणका! शापोरातील दोन नाईट क्लब सील, ध्वनी मर्यादा मिटर न वापरल्याने कारवाई

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT