Team India AFP
क्रीडा

SA vs IND: गोलंदाजांनी फोडला फलंदाजांना घाम! 7 तासांत घेतल्या 23 विकेट्स, तर भारताचे 6 खेळाडू शून्यावर बाद

South Africa vs India: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या केपटाऊन कसोटीत पहिल्याच दिवशी अनोखे विक्रम नोंदवले गेले.

Pranali Kodre

South Africa vs India, 2nd Test Match at Cape Town, Records:

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील दुसरा सामना बुधवारपासून (3 जानेवारी) केपटाऊनमध्ये खेळला जात आहे. या सामन्याचा पहिलाच दिवस गोलंदाजांनी गाजवला. त्यामुळे अनेक अनोखे विक्रमही नोंदवले गेले.

या सामन्यात पहिल्याच दिवशी एकूण 23 विकेट्स गेल्या. या सामन्यात दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 55 धावांत सर्वबाद झाल्यानंतर भारतीय संघाचा पहिला डावही 153 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर पहिल्या दिवसाखेर दक्षिण आफ्रिकेने 3 बाद 62 धावा केल्या. 

त्यामुळे कसोटी क्रिकेटच्या पहिल्याच दिवशी 23 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स जाण्याची ही केवळ दुसरीच वेळ ठरली. यापूर्वी 122 वर्षांपूर्वी म्हणजेच 1902 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात मेलबर्नला खेळले गेलेल्या कसोटीत पहिल्याच दिवशी 25 विकेट्स गेल्या होत्या.

याशिवाय कसोटी सामन्यात एकाच दिवशी 23 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स जाण्याची बुधवारची सहावी वेळही ठरली. यापूर्वी पाचवेळा अशी घटना घडली आहे. कसोटी सामन्याच एकाच दिवशी सर्वाधिक विकेट्स जाण्याचा विश्वविक्रम 1888 साली लॉर्ड्सवर झालेल्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याच्या नावावर आहे. त्या सामन्यात दुसऱ्या दिवशी तब्बल 27 विकेट्स गेल्या होत्या.

दरम्यान, केपटाऊनमध्ये एकाच दिवसात 23 विकेट्स जाण्याची ही दुसरी वेळ होती. यापूर्वी 2011 साली केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी 23 विकेट्स गेल्या होत्या.

कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी गेलेल्या सर्वाधिक विकेट्स -

  • २५ विकेट्स - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, मेलबर्न, 1902

  • २३ विकेट्स - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024

  • २२ विकेट्स - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, द ओव्हल, 1890

  • २२ विकेट्स - ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, ऍडलेड, 1951

  • २१ विकेट्स - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, गकेबेरा, 1896

कसोटी सामन्यातील एकाच दिवशी गेलेल्या सर्वाधिक विकेट्स

  • 27 विकेट्स - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरा दिवस), लॉर्ड्स, 1888

  • 25 विकेट्स - ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (पहिला दिवस), मेलबर्न, 1902

  • 24 विकेट्स - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरा दिवस), द ओव्हल, 1996

  • 24 विकेट्स - भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दुसरा दिवस), बंगळुरु, 2018

  • 23 विकेट्स- दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (दुसरा दिवस), केपटाऊन, 2011

  • 23 विकेट्स - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (पहिला दिवस), केपटाऊन, 2024

भारताचे 6 फलंदाज शुन्यावर बाद

दरम्यान, केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेला 55 धावांवर सर्वबाद केल्यानंतर भारताने चांगली सुरुवात केली होती. भारतीय संघाने 33 व्या षटकापर्यंत 4 बाद 153 धावा केल्या होत्या.

मात्र, 34 व्या षटकात लुंगी एन्गिडी गोलंदाजीला आला आणि त्याने या षटकात एकही धाव न देता केएल राहुल (8), रविंद्र जडेजा (0) आणि जसप्रीत बुमराह (0) यांना बाद करत भारताला मोठे धक्के दिले.

त्याच्या पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने आधी 46 धावांवर खेळणाऱ्या विराटला बाद केले, तर नंतर मोहम्मद सिराज (0) आणि प्रसिध कृष्णाला (0) लागोपाठच्या चेंडूवर बाद केले.

त्यामुळे 4 बाद 153 धावांवरून भारताचा डाव सर्बबाद 153 वर संपला. भारताकडून शेवटच्या 5 विकेटसाठी एकही धाव जोडण्यात आली नाही. भारताने 6 विकेट्स अवघ्या 11 चेंडूत गमावल्या. दरम्यान, भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरही शुन्यावर बाद झाले म्हणजेच भारताचे एकूण 6 खेळाडू शुन्यावर माघारी परतले.

त्यामुळे एकाच कसोटी डावात 6 खेळाडू शुन्यावर बाद होण्याची ही आठवी वेळ आहे, भारताची दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2014 साली मँचेस्टरला इंग्लंडविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारताचे 6 खेळाडू एकाच डावात शुन्यावर बाद झाले होते.

इतकेच नाही, तर अखेरच्या 5 विकेट्ससाठी शुन्य धावेची भागीदारी होण्याचीही ही 147 वर्षांच्या क्रिकेट इतिहासातील पहिलीच वेळ ठरली.

एकाच कसोटी डावात शुन्यावर सर्वाधिक बाद झालेले खेळाडू

  • 6 विकेट्स - पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, कराची, 1980

  • 6 विकेट्स - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, अहमदाबाद, 1996

  • 6 विकेट्स - बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, ढाका, 2002

  • 6 विकेट्स - भारत विरुद्ध इंग्लंड, मँचेस्टर, 2014

  • 6 विकेट्स - न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, दुबई, 2018

  • 6 विकेट्स - बांगलादेश विरुद्ध श्रीलंका, मिरपूर, 2022

  • 6 विकेट्स - बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, नॉर्थ साऊंड, 2022

  • 6 विकेट्स - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sex Racket Bust: वास्को पोलिसांची दाबोळीतील 'स्पा'वर छापेमारी, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करत सहा महिलांची सुटका; दोघे अटकेत

Krishnaji Kank: फोंडा किल्ल्यासाठी शंभूराजे दौडत आले, गोव्याचा गव्हर्नर पोर्तुगीज सैन्यासह पळत सुटला; शूरवीर कृष्णाजी कंकांची कथा

Terrorists Attack in India: हाफिज सईदकडून भारतावर हल्ल्याचा कट, बांगलादेशला 'लाँचपॅड' बनवण्याची तयारी; दहशतवादी सैफुल्लाहचा चिथावणीखोर VIDE0 व्हायरल

Ironman 70.3 Goa India: गोवा 'आयर्नमॅन' स्पर्धेत विदेशी खेळाडूंनी मारली बाजी! भारतीय एअर फोर्सनेही नोंदवला तिहेरी विजय

Pooja Naik: “संबंधितांची नावे उघड करावी, कोणाचीही गय करणार नाही”, पूजा नाईक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची कठोर भूमिका

SCROLL FOR NEXT