India Women's Cricket Team Twitter/WeAreTeamIndia
क्रीडा

Asian Games 2023: क्रिकेट अन् नेमबाजीत भारताला ऐतिहासिक सुवर्ण, दुसऱ्या दिवशी 6 पदकांची कमाई

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेचा सोमवारी दुसरा दिवस होता. या दिवशी भारताच्या खात्यात ६ पदके जमा झाली.

Pranali Kodre

19th Asian Games Hangzhou, 2nd Day 25th September, India Result: चीनमधील होंगझाऊ येथे 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत सोमवारी (25 सप्टेंबर) दुसरा दिवस होता.

या दिवशीही भारताच्या खात्यात एकूण 6 पदाकांची कमाई झाली आहे. यात 2 सुवर्णपदकांचा आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. याशिवाय वुशूमधील एक पदकही पक्के झाले आहे.

सोमवारी भारतासाठी पहिले सुवर्णपदक नेमबाजीत पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात मिळाले. या प्रकारात सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या भारतीय संघात दिव्यांश पनवार, ऐश्वर्य तोमर आणि रुद्रांक्ष पाटील यांचा समावेश होता. या तिघांनी मिळून केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर त्यांनी नवा विश्वविक्रमही रचला आहे.

त्यांनी 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात सर्वाधिक स्कोअर करण्याचा विश्वविक्रम केला आहे. त्यांचा अंतिम सामन्यात 1893.7 इतका स्कोअर होता.

तसेच ऐश्वर्यने 10 मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारातही कांस्य पदक जिंकले. याशिवाय नेमबाजीमध्येच पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तुल सांघिक प्रकारात भारताला कांस्य पदक मिळाले. या भारतीय संघात विजयवीर सिद्धू, आदर्श सिंग आणि अनिश भानवाला यांचा समावेश होता.

याशिवाय भारताला दुसरे सुवर्णपदक भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवून दिले. महिलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सोमवारी भारतीय संघाने श्रीलंकेला 19 धावांनी पराभूत केले. मल्टीस्पोर्ट्समधील हे भारतीय क्रिकेट संघाचे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे.

त्याचबरोबर सोमवारी रोइंगमध्येही दोन पदके भारताला मिळाली. चार जणांच्या सांघिक प्रकारात भारताला कांस्य पदक मिळाले आहे.

भारताच्या संघात जसविंदर सिंग, भीम सिंग, पुनित कुमार आणि आशिष यांचा समावेश होता. त्यांनी 6:10.81 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले.

तसेच पुरुषांच्या क्वाड्रपल स्कल प्रकारात भारतीय संघाने कांस्य पदक जिंकले आहे. भारतीय संघात सतनाम सिंग, परमिंदर सिंग, सुखमीत आणि जकर खान यांचा समावेश होता. त्यांनी 6:08.61 सेंकद वेळ नोंदवली.

वुशू या खेळात रोशिबिना देवी नाओरेम हिने उपांत्य फेरीत प्रवेश करत पदक पक्के केले आहे. तिने सोमवारी 60 किलो वजनी गटात उपांत्य पूर्व फेरीत विजय मिळवला.

त्याचबरोबर सोमवारी भारताचे स्विमर्स श्रीहरी नटराज आणि लिकित सेल्वराज यांनी आपापल्या प्रकारात अंतिम फेरीत प्रवेश केलेला, पण त्यांना पदक मिळवण्यात अपयश आहे. तसेच स्विमिंगमध्येही 4X200मीटर फ्रिस्टाईल रिले प्रकारातही भारताने अंतिम फेरीत प्रवेश केलेला, मात्र त्यांनाही पदक जिंकता आले नाही.

टेनिसमध्ये मात्र भारताला मोठा धक्का बसला. भारताची अव्वल मानांकित जोडी रोहन बोपन्ना आणि युकी भांबरी यांना दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पण अन्य भारतीय टेनिसपटूंनी पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

बॉक्सिंगमध्ये पुरुषांच्या 71 किलो वजनी गटात निशांत देव आणि पुरुषांच्या 51 किलो वजनी गटात दिपक भोरिया यांनी उपउपांत्य फेरीतील सामने जिंकले आहेत, तर महिलांच्या 66 किलो वजनी गटात अरुंधती चौधरीचे आव्हान संपले आहे.

दरम्यान, भारताच्या खात्यात पहिल्या दिवशी 3 रौप्य आणि 2 कांस्य अशी पाच पदके मिळाली होती. त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाखेर भारताच्या खात्यात एकूण 11 पदके झाली आहेत. यात 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारत 6 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर एकूण 69 पदकांसह चीन आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT