Mobile Unlock Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Mobile Unlock: काय सांगता, आता Breathing द्वारे अनलॉक होणार स्मार्टफोन, काय आहे नवीन फीचर...

काहींनी फोटो दाखवून फोन अनलॉक केला, तर काहींनी झोपलेल्या यूजर्सच्या बोटांनी फोन अनलॉक केले.

Puja Bonkile

Mobile Unlock: आजकाल सर्व लोकांकडे स्मार्टफोन आहेत. त्यातील डेटा सुरक्षित राहावा यासाठी लॉकचे अनेक फिरर्च आहेत. पण जेव्हा स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक आणि फिंगरप्रिंट सारखे फिचर्स आले, तेव्हा असा दावा करण्यात आला की ही सुरक्षा तोडने अवघड आहे. परंतु कालांतराने ते देखील तोडणे शक्य झाले. काहींनी फोटो दाखवून फोन अनलॉक केला, तर काहींनी झोपलेल्या यूजर्सच्या बोटांनी फोन अनलॉक केले.

आता या सर्व सुरक्षा व्यवस्थेचा भंग झाला आहे. लवकरच तुम्ही ब्रिदिंगद्वारे तुमचा फोन अनलॉक करू शकाल. त्याचा मोठा फायदा असा होईल की मृत व्यक्तीचा फोन अनलॉक करता येणार नाही, जसे फिंगरप्रिंटच्या बाबतीत शक्य आहे.

चेन्नईच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे महेश पंचगुला आणि त्यांच्या टीमने त्यांच्या प्रयोगानंतर हा दावा केला आहे. टीमच्या म्हणण्यानुसार, हा प्रयोग हवेच्या दाब सेन्सरमधून गोळा केलेल्या ब्रिदिंगच्या डेटासह करण्यात आला आहे. या डेटाच्या मदतीने एआय मॉडेल तयार करणे हेच टीमचे उद्दिष्ट होते.

रिसर्च टिमच्या म्हणण्यानुसार, एकदा त्यांचे एआय मॉडेल एखाद्याच्या ब्रिदिंगच्या डेटाचे विश्लेषण केल्यानंतर ते 97 टक्के अचूकतेने तपासू शकते की त्याने विश्लेषित केलेला श्वास त्या व्यक्तीचा आहे की नाही.

रिसर्च टीमच्या म्हणण्यानुसार, हे एआय मॉडेल श्वास घेताना एखाद्या व्यक्तीच्या नाक, तोंड आणि घशातून निर्माण होणार्‍या अशांततेचे स्वरूप ओळखू शकते. प्रत्येक व्यक्तीची श्वासोच्छवासाची गती वेगळी असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT