Year Ender 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Year Ender 2023: या वर्षी तब्बल इतक्या भाविकांनी केली चारधाम यात्रा

Puja Bonkile

Year Ender 2023: हिंदू धर्मात चार धाम यात्रेला खूप महत्व आहे. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी चार धामला भेट द्यायची असते. दरवर्षी मोठ्या संख्येने चारधाम यात्रेत सहभागी होतात. चारधाममध्ये केदारनाथ, बद्रीनाथ, यमनोत्री आणि गंगोत्री यांचा समावेश आहे. या चार धाम सोबतच, इतर प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्रांवर देखील 2023 मध्ये भाविकांचा अलोट गर्दी पाहायला मिळाली आहे. चला तर मग जाणून घेऊया 2023 मध्ये किती भाविक कोणत्या धामला भेट देण्यासाठी आले होते.

  • बद्रीनाथ धाम

भगवान विष्णूच्या भक्तांसाठी बद्रीनाथ मंदिराला भेट देणे हे एक मोठे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. यावर्षी बद्रीनाथ यात्रा 27 एप्रिलपासून सुरू झाली आणि 15 नोव्हेंबर 2023 रोजी संपली. यंदा बद्रीनाथमध्ये 18 लाख 34 हजारांहून अधिक भाविकांनी येथे दर्शन घेतले.

  • गंगोत्री यात्रा 2023

या वर्षी 9 लाख 5 हजारांहून अधिक भाविकांनी गंगोत्री यात्रा पूर्ण केली होती. 2023 मध्ये गंगोत्री यात्रा 22 एप्रिलपासून सुरू झाली होती, तर ती 14 नोव्हेंबरला संपली होती. दरवर्षी गंगोत्री यात्रा सुरू झाली की लाखो भाविक गंगा मातेच्या दर्शनासाठी येतात.

  • यमुनोत्री

या वर्षी 7 लाख 35 हजारांहून अधिक भाविक यमुनोत्रीला दर्शनासाठी पोहोचले होते. यमुनोत्री यात्रा 22 एप्रिल 2023 रोजी सुरू झाली आणि 15 नोव्हेंबर रोजी संपली. यमुनोत्री हे यमुनेचे निवासस्थान आहे असे म्हटले जाते. येथे यमुना देवीचे मंदिर देखील आहे.

  • अमरनाथ यात्रा

चार धाम व्यतिरिक्त इतर तीर्थक्षेत्रांबद्दल बोलायचे झाले तर 2023 मध्ये सुमारे 4 लाख 40 हजार भाविकांनी अमरनाथला भेट दिली. यावर्षी अमरनाथ यात्रा 1 जुलै 2023 पासून सुरू झाली आणि 31 ऑगस्ट 2023 रोजी संपली. अमरनाथची यात्रा अत्यंत अवघड मानली जाते. परंतु असे असतानाही भाविक दरवर्षी दर्शनासाठी पूर्ण भक्तिभावाने आणि उत्साहाने येतात.

  • हेमकुंड साहिब

हेमकुंड साहिब हे शिखांच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. यंदा हेमकुंड साहिबची यात्रा 20 मे ते 11 ऑक्टोबर 2023 पर्यंत चालली. हेमकुंड साहिब यात्रेसाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात. 2023 मध्ये सुमारे 2 लाख लोक हेमकुंड साहिबला पोहोचले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT