Year End 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Year End 2023: 'हे' 5 ऑनलाइन स्कॅम राहिले सर्वाधिक चर्चेत

या वर्षात कोणते ऑनलाइन स्कॅम झाले आहेत हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

Year End 2023: यंदा 2023 हे वर्ष टेक्नोलॉजीसाठी खुप खास राहिले आहे. स्मार्टफोन लाँच झाल्यापासून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. 2023 मध्ये फसवणूक आणि घोटाळ्यांची प्रकरणेही समोर आली आहेत.

अलीकडे, डीपफेक व्हिडिओंबाबत एआयच्या वापराबद्दल बरीच चर्चा झाली. आता वर्ष संपत येत असताना, इयर एंडरची बरीच चर्चा होत आहे. यावर्षी फसवणूकीची प्रकरणेही समोर आली.

टेक्नॉलॉजीच्या वाढीमुळे आपले जीवन जितकं सोपं झालं आहे तितकंच त्याचे धोकेही वाढले आहेत. नवीन टेक्नॉलॉजीमुळे फसवणूकच्या नवीन पद्धतींनाही जन्म दिला आहे. यावर्षी हॅकर्सनी लोकांना फसवणुकीसाठी नवीन मार्गांनी लक्ष्य केले. या वर्षी घडलेल्या अशाच 5 घोटाळ्यांबद्दल जाणून घेऊया.

YouTube Video Like

युट्युब व्हिडीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याचाही घोटाळा उघडकीस आला आहे. यामध्ये घोटाळेबाज लोकांना यूट्यूब व्हिडिओ पाहून आणि लाईक करून पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचे बळी बनवले आहे.

AI Fake Call

AIच्या वाढत्या वापरामुळे घोटाळेबाजांनी या वर्षी फसवणूक करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे. या प्रकारच्या घोटाळ्यात स्कॅमर एआयद्वारे तुमच्या कोणत्याही नातेवाईकांच्या आवाजात कॉल आणि व्हिडिओ कॉल करतात. यामध्ये महत्त्वाच्या कामाचे कारण देत लोकांकडून पैसे ट्रान्सफर करायला लावतात.

QR Code

या वर्षी क्यूआर कोड देखील चर्चेत राहीला आहे. जेव्हा स्कॅमर फसवणूक करणारा QR कोड स्कॅन करतात तेव्हा यूजर्स फिशिंग पेज आणि मालवेअर साइट्सपर्यंत पोहोचतात. याद्वारे ते त्यांना फसवणुकीचे बळी बनवतात. याद्वारे स्कॅमर यूजर्सचे वैयक्तिक तपशील देखील चोरतात.

Fake Job

रोजगाराचा झपाट्याने वाढता अभाव पाहता आता घोटाळेबाज लोकांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करत आहेत. 2023 मध्ये खोट्या नोकऱ्या घोटाळ्याची अनेक प्रकरणे समोर आली. यामध्ये घोटाळेबाज बनावट नोकर्‍या तयार करतात आणि लोकांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवतात आणि अनेक लोक नोकरी मिळवण्यासाठी त्यांचे वैयक्तिक माहिती देखील शेअर करतात. घोटाळेबाजांनी याद्वारे अनेकांना आपले बळी बनवले.

Whatsapp Call

2023 मध्ये व्हॉट्सअॅप कॉल जास्त चर्चेत राहिले आहे. सामान्य कॉल्स व्यतिरिक्त स्कॅमर्सना व्हॉट्सअॅप कॉलद्वारे लोकांची फसवणूक करण्याचा नवीन मार्ग सापडला आहे. अनेक यूजर्सनी तक्रार केली की त्यांना एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून व्हॉट्सअॅप कॉल आला, ज्यामध्ये त्यांना वैयक्तिक माहिती विचारण्यात आली. व्हॉट्सअॅप कॉलमध्ये लोकांना नोकरीच्या बहाण्याने माहिती विचारला जात होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: नवी मुंबईला मिळाली जागतिक ओळख, नव्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; पाहा खास Photos Videos

लेट नाईट ऑपरेशन! कोलवा येथे मसाज पार्लरमधून नऊ मुलींची सुटका; पोलिस, अर्ज यांची संयुक्त कारवाई

GDS Recruitment: 'कोकणी भाषा येते?' गोंयकारांसाठी उघडलंय रोजगाराचं दार, पोस्टात काम करण्याची संधी; वाचा माहिती

Goa Nestle Case : नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Pakistan Terror Attack: पाकिस्तानी लष्करावर मोठा दहशतवादी हल्ला, लेफ्टनंट कर्नल, मेजरसह 11 ठार; 'या' दहशतवादी गटाने घेतली हल्ल्याची जबाबदारी

SCROLL FOR NEXT