World Oral Health Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Oral Health Day 2023: मौखिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

केस, त्वचा यासह मौखिक आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

दैनिक गोमन्तक

World Oral Health Day 2023: आपण ज्या प्रकारे त्वाचा, केसांची काळजी घेतो तसेच तोंडाची देखील काळजी घेणे गरजेचे आहे. आजसुद्धा असे अनेक लोक आहेत जे योग्य प्रकारे तोंड स्वच्छ करत नाहीत.

तोंडातून येणार्‍या दुर्गंधीबद्दल लोकांना माहितीही नसते. मौखिक आरोग्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठीच या दिवसाची सुरुवात करण्यात आली. जाणून घेउया तोंडाची काळजी कशी घेतली पाहिजे.

जागतिक मौखिक आरोग्यदिनाची सुरुवात 20 मार्च 2013 रोजी एफडीआय वर्ल्ड डेंटल फेडरेशनने केली. तेव्हापासून हा दिवस (World Oral Health Day 2023) दरवर्षी साजरा केला जातो.

यानंतर पुढील वर्षापासून, आंतरराष्ट्रीय दंत विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या सहकार्याने वार्षिक जागतिक एफडीआय स्पर्धा देखील आयोजित केली जात आहे. 

तोंडाची काळजी न घेतल्यास आरोग्य अनेक आजार उद्भउ शकतात. तोंडात असलेल्या अॅसिडमुळे दात किडणे, जंत यांसारख्या समस्या उद्भवतात.

त्यामुळे दातांची इनॅमल पोकळ होऊ लागते आणि त्यामुळेच पोकळी तयार होतात. याशिवाय तोंडात असलेले बॅक्टेरिया दात खराब करू लागतात. वेळीच काळजी न घेतल्यास तोंडाचा कर्करोगही होऊ शकतो.

  • तोंडाची काळजी कशी घ्यावी

तोंड स्वच्छ राहण्यासाठी दिवसातून दोनदा ब्रश करावे.

सकाळी एकदा आणि झोपण्यापूर्वी एकदा ब्रश करणे गरजेचे आहे. यामुळे दात निरोगी राहतात.

घशात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास किंवा तोंडात काही समस्या असल्यास कोमट पाण्यात मीठ टाकून गार्गलिंग करु शकता.

साधारणपणे पोट खराब असलेल्या लोकांची जीभ घाण राहते. जीभ टंग क्लीनरने स्वच्छ करता येते. ज्या लोकांना हा त्रास असतो त्यांनी टंग क्लीनरचा वापर करावा.

फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरावी. त्यामुळे दात किडण्याची समस्या कमी होते.

वर्षातून दोनदा दंतवैद्याकडे जावे. त्यामुळे कोणताही आजार होण्याची शक्यता टाळता येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT