World Motorcycle Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Motorcycle Day 2023: बाईकवर लांबचा प्रवास करताय, मग 'या' गोष्टी सोबत ठेवाच

अनेकदा लोकांना असे वाटते की बाईक चालवण्यासाठी फक्त हेल्मेट आवश्यक आहे, परंतु याशिवाय देखील अशा गोष्टी आहेत ज्या सोबत असणे गरजेचे आहे.

Puja Bonkile

World Motorcycle Day 2023: आज आंतरराष्ट्रीय दिनासह जागतिक मोटरसायकल दिवसही आहे. बाईक चालवण्याची आवड असलेले लोक या दिवशी त्यांच्या बाईकवर लांबच्या प्रवासासाठी बाहेर पडतात.

पण बाईकवर लाँग ड्राईव्हसाठी जात असाल, तर तुमच्यासोबत कोणत्या आवश्यक गोष्टी असाव्यात हे माहिती नसेल तर ही बातमी पुर्ण वाचा.

  • राइडिंग सूट

लाँग ड्राईव्हसाठी बाईक चालवताना केवळ हेल्मेट घालणे पुरेसे नाही. स्वतःचे संरक्षण करण्यासाठी राइडिंग जॅकेट आणि पँट असणे देखील आवश्यक आहे. 

जॅकेट परिधान केल्याने रायडरची सुरक्षा तर होतेच पण त्याच्यात एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वासही निर्माण होतो. यासोबतच रायडिंग सूटही खूप स्टायलिश लुक देतो.

  • फेस मास्क

फेस मास्क प्रवासादरम्यान उडणाऱ्या धुळीपासून रायडरचे संरक्षण करतो. तसेच चेहऱ्यालाही संरक्षण देतो. बाईक चालवताना अनेकदा डोळ्यात धुळीचे कण जाण्याचा धोका असतो, हा मास्क अनेक समस्यांपासून बचाव करतो. यामुळे बाईक चालवतांना फेस मास्क वापरावा.

  • हेलमेट

बाईक चालवताना हेल्मेट सर्वात महत्वाची गोष्ट आहे. अपघाताच्या वेळी बाईक राईडरचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट सर्वात जास्त उपयुक्त ठरते. चलन टाळण्यासाठी, लोक सहसा स्वस्त हेल्मेट खरेदी करतात. पण असे अजिबात सुरक्षित नाही. नेहमी ISI चिन्ह असलेले हेल्मेट वापरावे.

  • ग्लॉव्स

बाइक चालवताना ग्लॉव्स देखील खूप महत्वाचे आहेत. यामुळे बाईक राईडरच्या हातांना संरक्षण मिळते. हातांची पकडही ग्लोव्हजसह चांगली असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 16 September 2025: र्थिक ताण जाणवू शकतो, रोग्याबाबत थोडी काळजी घ्यावी; मित्रांकडून मदत

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

SCROLL FOR NEXT