World Mental Health Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Mental Health Day 2023: 'ही' लक्षणे दिसताच व्हा सावध, अन्यथा वाढू शकते डिप्रेशन

आज जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जाणून घेऊया सुरूवातील कोणती लक्षणे दिसतात.

Puja Bonkile

World Mental Health Day 2023: दरवर्षी मानसिक आरोग्य दिन १० ऑक्टोबरला साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आहवालानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर आठपैकी एक व्यकेती मानसिक आजाराला बळी पडत आहे. लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

आजकाल लोकांमध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशनची समस्या सामान्य झाली आहे. कामाचा दबाव, आर्थिक समस्या किंवा नातेसंबंधात येणाऱ्या अडचणी यासारखी अनेक कारणे असू शकतात.

डिप्रेशन हा एक मानसिक विकार आहे. ज्यामुळे व्यक्ती उदास, निराश राहू लागतो. डिप्रेशनमुळे कोणत्याही व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जाणून घेऊया डिप्रेशनमध्ये सुरूवातील कोणते लक्षण दिसतात.

डिप्रेशनमध्ये जाणवणारी लक्षणे-

1) दुःख आणि एकटेपणाची भावना

डिप्रेशनमुळे, बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला आठवडे किंवा महिने खूप दुःखी आणि एकटेपणा जाणवू लागतो.

2) कोणत्याही कामात इंटरेस्ट नसणे

डिप्रेशननेग्रस्त असलेल्या व्यक्तीला कोणत्याही कामात रस नसतो.

3) भूक आणि वजनात बदल

डिप्रेशनमुळे जेवणाची इच्छा राहत नाही किंवा अतिप्रमाणात जेवण करतो. यामुळे व्यक्तीचे वजन अचानक कमी होऊ लागते किंवा वाढू लागते.

4) झोपेची समस्या

डिप्रेशनध्ये झोप न येणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येमुळे अनेक वेळा लोक एकतर अजिबात झोपत नाहीत किंवा गरजेपेक्षा जास्त झोपतात.

5) थकवा जाणवणे

रात्रभर झोपल्यानंतरही सतत थकवा जाणवणे आणि उर्जेची कमतरता जाणवणे हे डिप्रेशनचे खास लक्षण आहे.

6) लक्ष केंद्रित करण्यात अडचण

डिप्रेशनमुळे एखाद्या व्यक्तीची लक्ष केंद्रित करण्याची, निर्णय घेण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होऊ शकते. ज्यामुळे त्यांच्या कामावर परिणाम होऊ शकतो.

7) अपराधीपणाची भावना

डिप्रेशनने ग्रस्त लोकांमध्ये सहसा नकारात्मक विचार, अपराधीपणाची भावना आणि भविष्याबद्दल निराशेची भावना .निर्माण होते.

8) जास्त राग

डिप्रेशनमुळे लोक लहान-सहान गोष्टींवर चिडचिड आणि रागावू शकतात.

9) लोकांशी संवाद न साधणे

डिप्रेशनने ग्रस्त लोक मित्र, नातेवाईक आणि सामाजिक कार्यक्रमापासून पूर्णपणे दूर राहतात.

10) मृत्यू आणि आत्महत्येचा विचार

डिप्रेशनने ग्रस्त असलेल्या व्यक्तीच्या मनात सतत मृत्यू आणि आत्महत्येचा विचार येतो. असे विचार येणे ही डिप्रेशनची सर्वात धोकादायक स्थिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

Paroda Murder Case: पारोड्यात महिलेचा अज्ञाताकडून खून! संशयित कामगाराचा शोध सुरू

एकाच दिवशी Cash For Job मधील ठकसेनांना जामीन! तक्रारदारांची मात्र चिंता संपेना

Cash For Job प्रकरणातील तक्रारदारांचे मोबाईल जप्त केल्‍याचा दावा; संशयितांचे कॉल डिटेल्स, लोकेशन्‍स जाहीर करण्याचे मुख्यमंत्र्यांना आव्हान

Anjuna Villagers Protest: हणजुणेत स्थानिक आक्रमक! मेगा इव्हेंट्सविरोधात धरणे आंदोलन; ध्वनी प्रदूषणाविरोधी झळकावले फलक

SCROLL FOR NEXT