Old Goa Church  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Heritage Day|ओल्ड गोव्यातील चर्चला मिळाले जागतिक वारसा स्थळाचे मानांकन

भारतातल्या सर्व महत्त्वाच्या राजवटींनी गोव्यावर राज्य केले आहे.

दैनिक गोमन्तक

आज जागतिक वारसा दिन. जगभरातल्या अनेक प्राचीन, ऐतिहासिक स्थळांना ‘युनेस्को’ विशिष्ट निकषाने जागतिक वारसा स्थळाचे मानांकन देते. ओल्ड गोव्यातल्या (Old Goa) काही काहीच चर्चना (Church) हे मानांकन मिळाले आहे. दक्षिण गोव्यातल्या, सांगे तालुक्यातली कातळशिल्पेही युनेस्कोचे हे मानांकन मिळवण्याच्या मार्गावर आहेत. (World Heritage Day latest News)

गोव्याला (Goa) फार प्राचिन इतिहास आहे. भारतातल्या सर्व महत्त्वाच्या राजवटींनी गोव्यावर राज्य केले आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकातल्या, सम्राट अशोकाच्या काळातल्या बौद्ध भिक्षूकांचा वावर गोव्यात होता. त्यानंतर सातवाहन, क्षत्रप, अभिर, भोज, यादव, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार, कदंब यांच्या राजवटींनी गोव्यावर राज्य करतानाच्या आपापल्या खुणा इथे ठेवल्या आहेत. त्यानंतरच्या दिल्लीची सल्तनत, विजयनगर साम्राज्य, बदामी सल्तनत, आदिलशाही, पोर्तुगीज (Portugal) या राजवटींनीही गोव्यात आपापल्या स्थापत्याच्या रचना मांडल्या. यातल्या अनेक रचना आपण आजही पाहू शकतो. या साऱ्या रचनांना धार्मिकतेचे मोल आहेच. पण अतिशय महत्त्वाचे असे सांस्कृतिक मुल्यही आहे. आपल्या भूमीने जी स्थित्यंतरे अनुभवली त्याचे ते जणू एक प्रकारे स्तर आहेत. ही स्थळे किंवा या खुणा पाहताना आपण त्या काळच्या सामाजिकतेलाही, एका वेगळ्या काळातून हात लांबवून, एक प्रकारे स्पर्श करत असतो.

अशा अनेक महत्त्वांच्या खुणा, अनेक कारणांमुळे नष्टही होत असतात. आपल्या अज्ञानामुळे किंवा आधुनिकतेच्या विचित्र हव्यासामुळे अनेकदा तसे घडते. गोव्यातील कितीतरी सुंदर, सुबक देवळे केवळ राजकीय पुढाऱ्यांनी (मतदारांना खुश करण्यापोटी) पैसे पुरवल्यामुळे आपली परंपरागत रचना बदलून सिमेंटच्या छताखाली आणि गिलाव्याखाली हरवून गेली आहेत. रस्त्याच्या कडेला दुर्लक्षित असणारे पाषाणी शिलालेख कालांतराने तिथून नाहीसे होऊन गेले आहेत. भग्न देवळातल्या मूर्तींना कुणीतरी उचलून विक्रीलाही काढले आहे. हा सारा खरेतर वैभवशाली वारसा होता पण बेफिकिरीमुळे तो दुरावला गेला.

जगभरच्या समृद्ध वारसाकडे जबाबदारीच्या नजरेने पाहण्यासाठी आणि त्यात जागृकता आणून त्यांचे संवर्धन करण्यासाठी 1983 पासून युनेस्कोने (युनायटेड नेशन्स एज्युकेशनाल सायंटिफिक अंड कल्चरल ऑर्गनायझेशन) जागतिक वारसा दिन साजरा करायला सुरुवात केली. यंदाच्या या वारसा दिनाचा विषय आहे, ‘वारसा आणि हवामान’. या विषयाद्वारे हवामान बदलाशी लढण्यासाठी ‘वारसा’ हा एक महत्त्वाचा ज्ञानस्त्रोत कसा बनू शकतो यासंबंधी उपक्रम आखण्यास युनेस्कोने प्राधान्य दिले आहे. यासंबंधी वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमासाठी सुचवलेल्या विषयांमध्ये ‘आपत्ती जोखीम’ (हवामान आणि मानव प्रेरीत), ‘स्थानिक वारसास्थळे’, ‘वारसा आणि लोकशाही’, ‘वारसा आणि संघर्ष’, ‘पवित्र जागा अथवा वारसा’ यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

Goa Live News: 8 दिवसांत रस्त्याची दुरुस्ती न केल्यास खड्ड्यात 200 काजुची रोपे लावण्याचा ग्रामस्थाचा इशारा

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

SCROLL FOR NEXT