World Heritage Day: गोव्यातील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळं पाहिलीत का?

गोव्यातील महत्त्वाची ऐतिहासिक स्थळं पहा एका क्लिकवर
World Heritage Day
World Heritage DayDainik Gomantak
Basilica of Bom Jesus
Basilica of Bom JesusDainik Gomantak

बॅसिलिका ऑफ बॉम जीझस

बेसिलिकाचे बांधकाम 1594 मध्ये सुरू झाले आणि 1605 मध्ये पूर्ण झाले. चर्चचा (Church) एक दर्शनी भाग भव्य ग्रॅनाइटने सुशोभित आहे. चर्चच्या मुख्य सभागृहाचा भाग एक प्रशस्त आयताकृती आहे. चर्चच्या (Church) भागात दोन चॅपल आहेत - उत्तरेकडील चॅपल पवित्र विधींसाठी समर्पित आहे, तर दक्षिणेकडील चॅपलमध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियरची संगमरवरी समाधी आहे. मुख्य वेदी पवित्र ट्रिनिटीच्या चिन्हासह बाळ येशूला समर्पित आहे, त्यावरूनच चर्चला ‘बॉम जिजस’ (Bom Jesus) हे नाव प्राप्त झाले आहे.

 Aguada Fort
Aguada FortDainik Gomantak

आग्वाद किल्ला

आग्वाद किल्ला 17 व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आणि दीपगृह आहे. हे सिंक्वेरिम बिचवर असलेल्या वसलेले आहे. हा किल्ला मुळत: डच आक्रमणाविरुद्ध बांधला गेला होता. गोव्यातील (Goa) एक भव्य प्रेक्षणीय भव्य स्थळ म्हणून ओळखले जाते.

Dainik Gomantak

गोव्याचे (Goa) हे एक अनोखे संग्रहालय आहे. येथे तुम्हाला गोव्याचे जुने मार्ग, गोवन लोकांच्या चालीरीती पाहायला मिळतील. येथे तुम्हाला रेस्टॉरंट, डान्स फ्लोअर आणि बऱ्याच गोष्टीचा आनंद घेता येईल.

शांतादुर्ग मंदिर
शांतादुर्ग मंदिरDainik Gomantak

गोव्यातील प्रसिद्ध शांतादुर्ग मंदिर आहे. उत्तर गोव्यातील पोंडा तालुक्यात हे मंदिर वसलेले आहे. माँ शांतादुर्गाचे मंदिर हे गोव्यातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना भारतीय आणि पोर्तुगीज वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराच्या दोन्ही बाजूला अतिथीगृह इमारती उभ्या आहेत आणि मंदिरासमोर मोठा तलाव आहे.

दूधसागर धबधबा
दूधसागर धबधबाDainik Gomantak

* दूधसागर धबधबा

गोव्यातील (Goa) दूधसागर धबधबा हे अनेक पर्यटकांचे मन वेधून घेणारे ठिकाण आहे. मंडोवी नदीवर वसलेले आहे. तुम्ही येथे जीप सफरीचा आनंद घेवु शकता. पण तुम्हाला जर खरा आनंद घ्यायचा असेल तर येथे तुम्ही पावसाळ्यात ट्रेकिंग करण्यासाठी जावु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com