Breastfeeding has many benefits for the baby and the mother Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Breastfeeding Week 2021: स्तनपानाचे बाळाला आणि आईला अनेक फायदे

स्तनपानामुळे नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढते.

दैनिक गोमन्तक

दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत जगभरात 120 देशांमध्ये जागतिक स्तपान सप्ताह (World Breastfeeding Week) साजरा केला जातो. याची सुरुवात 1991मध्ये झाली आणि 1992 मध्ये हा कार्यक्रम पहिल्यांदा साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा उद्देश स्तनपानाचे फायदे (Advantages) आणि महत्व (Importance) याबद्दल जागरूकता करणे हा आहे. दरवर्षीप्रमाणे या आठवड्यातही एक थीम (Theme) ठरवली आहे. या वर्षीची थीम "स्तनपान सुरक्षित करा: ही आपली जबाबदारी" अशी आहे.

* स्तनपानाचे फायदे

* नवजात बाळासाठी (Baby) आईचे दूध खूप फायदेशीर असते. कारण आईच्या दुधात अनेक पोषक घटक (Nutrients) असतात. यामुळे नवजात बाळाला अनेक आजारांपासून (Disease) दूर ठेवून रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) वाढण्यास मदत मिळते.

* जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफ दरवर्षी जागतिक स्तनपान (Breastfeeding) सप्ताहादरम्यान स्तनपानाविषयी जनजागृती करतात.

* स्तनपानामुळे नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढण्यास मदत मिळते. तसेच बाळाची बौद्धिक क्षमता वाढते.

* मुलांमध्ये कर्करोग, मधुमेह, यासारखे आजार दूर राहतात. तसेच बालमृत्यूदर कमी होण्यास मदत मिळते.

* आईचे दूध नवजात बाळासाठी पौष्टिक (Nutritious) असून निरोगी (Healthy) असते. तसेच बाळाला अनेक संसर्गजन्य आजारांपासून दूर ठेवते.

कोरोना काळात सुरक्षितरित्या स्तनपान करावे

* स्तनपान करण्यापूर्वी महिलांनी आपले हात 20 सेकंद स्वच्छ पाण्याने किंवा साबणाने धुवावे.

* जर तुम्ही कोरोना पॉजिटिव्ह (Corona positive) असला तर बाळाला स्तनपान करण्याआधी ब्रेस्ट पंप (Breast pump) वापरावा. ब्रेस्ट पंप कोणाबरोबरी शेयर करू नका. ब्रेस्ट पंपचा वापर झाल्यानंतर ते स्वच्छ धुवून ठेवावे.

* बाळाला स्तनपान करतांना महिलांनी मास्क (Mask)वापरावा. याशिवाय स्वत:च्या आणि आपल्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT