World Brain Tumour Day Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Brain Tumour Day: डोकेदुखी-मळमळ असू शकते ब्रेन ट्यूमरचे लक्षणं, वेळीच व्हा सावध

ब्रेन ट्यूमरबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांना शिक्षित करण्यासाठी दरवर्षी 8 जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो.

Puja Bonkile

World Brain Tumour Day 2023: दरवर्षी 8 जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिन म्हणून साजरा केला जातो.लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

जगाबरोबरच भारतातही ब्रेन ट्युमरच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. दरवर्षी देशातील विविध वयोगटातील लोकांमध्ये ब्रेन ट्यूमरची अधिकाधिक प्रकरणे नोंदवली जातात. 2018 मध्ये ब्रेन ट्यूमरला भारतीयांमध्ये (India) 10 वा सर्वात सामान्य प्रकारचा ट्यूमर म्हणून स्थान देण्यात आले. 

इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ कॅन्सर रजिस्ट्रीज (IARC) च्या मते, भारतात दरवर्षी ब्रेन ट्यूमरची 28,000 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली जातात आणि दरवर्षी 24,000 पेक्षा जास्त लोक ब्रेन ट्यूमरमुळे मरतात. 

ब्रेन ट्यूमर (Brain Tumor) ही एक गंभीर स्थिती आहे आणि लवकर शोधून उपचार न केल्यास ते प्राणघातक ठरू शकते. ब्रेन ट्यूमर म्हणजे काय, लक्षणे आणि उपचारांबद्दल तज्ञांचे काय म्हणणे आहे? हे जाणून घेउया.

  • ब्रेन ट्यूमरची लक्षणे

ब्रेन ट्यूमरची लक्षणे इतर आजारांसारखेच असू शकतात. कारण ती वेगळी नसतात. उदाहरणार्थ, लोक ब्रेन ट्यूमरमुळे होणाऱ्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू शकतात आणि वेदनाशामक औषधे घेत राहू शकतात. 

ही लक्षणे ट्यूमरमुळे दिसून येत नाहीत तर ट्यूमरमुळे मेंदूवर (Brain) पडणाऱ्या दाबामुळे ती दिसून येतात. ब्रेन ट्यूमर असलेल्या लोकांना डोळ्यांशी (Eyes) संबंधित समस्या देखील असू शकतात. मळमळ किंवा उलट्या हे देखील एक लक्षण आहे जे लोक ब्रेन ट्यूमरमध्ये पाहू शकतात. 

मेंदू बहुतेक शारीरिक कार्ये नियंत्रित करतो आणि ट्यूमरच्या आसपासच्या भागाच्या कम्प्रेशनमुळे लक्षणे निर्माण करतो. ब्रेन ट्यूमरच्या लक्षणांमध्ये डोकेदुखी आणि उलट्या होणे, दृष्टी कमी होणे किंवा अस्पष्ट होणे, ऐकणे कमी होणे, अशक्तपणा, बोलण्यात अडचण, गिळण्यात अडचण इत्यादींचा समावेश असू शकतो.

  • ब्रेन ट्यूमरची लक्षम ज्याकडे लोक दुर्लक्ष करतात

1. वारंवार डोकेदुखी

गंभीर डोकेदुखीकडे कधीही दुर्लक्ष करू नका. डोकेदुखी खूप सामान्य आहे परंतु जर ती अनेक दिवसांपासून असेल तर डॉक्टरांना दाखवावे.

2. डोळ्यांची समस्या

अंधुक दृष्टी, दुहेरी दृष्टी, किंवा अचानक दृष्टी कमी होणे यासारख्या डोळ्यांच्या समस्या देखील ब्रेन ट्यूमर दर्शवू शकतात. 

3. मळमळ आणि उलट्या

सतत मळमळ, उलट्या किंवा चक्कर येणे हे मेंदूतील गाठीचे लक्षण असू शकते.

4. हार्मोन्समधील असंतुलन

डॉक्टर म्हणतात की हार्मोन्समधील असंतुलन देखील ब्रेन ट्यूमरच्या विकासात मोठी भूमिका बजावू शकते. ज्या महिला दीर्घकाळ हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी घेतात त्यांना त्याचा धोका अधिक असतो.

5. मोबाईलचा सतत वापर

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मोबाईल फोनचा वापर आणि मानवामध्ये ब्रेन ट्यूमर विकसित होण्यामध्ये एक संबंध आहे, ज्याचे पुरावे देखील अस्तित्वात आहेत.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, मोबाईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन उत्सर्जित करतात, जे मानवांसाठी कर्करोगजन्य आहे; म्हणजेच कर्करोगास कारणीभूत आहे.

तज्ञांनी शिफारस केली आहे की तुम्ही हँड्सफ्री, वायरलेस डिव्हाइसेस जसे की हेडफोन किंवा स्पीकरवर फोन वापरावा. मोबाईलपासून (Mobile) जेवढे शक्य असेल तेवढेच अंतर ठेवा.

  • ब्रेन ट्यूमरची इतर लक्षणे

डोके दुखणे
मळमळणे किंवा उलट्या होणे
डोळ्यांच्या समस्या
हात किंवा पाय सुन्न होणे
बोलण्याची समस्या
दैनंदिन कामांमध्ये गोंधळ
स्मरणशक्तीच्या समस्या
व्यक्तिमत्त्वात किंवा वागण्यात बदल
झटके
ऐकण्याच्या समस्या
चक्कर येणे
अति भूक आणि वजन वाढणे

जर कोणाला ही लक्षणे दीर्घकाळ दिसली तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: संत फ्रान्सिस झेवियर अवशेष प्रदर्शन; आलेमाव फॅमिलीने घेतले गोंयच्या सायबाचे दर्शन

IFFI 2024: गोमंतकीय फिल्ममेकर्ससाठी खुशखबर! कलाकार, निर्मात्‍यांसाठी विशेष मास्टर्स क्लास; दिलायला यांची माहिती

IFFI 2024: ‘वुमन सेफ्टी अँड सिनेमा’ सत्रात मान्यवरांची ‘सेफ बॅटिंग’! 'पॉवर प्ले आहे पण..', भूमी पेडणेकरचे मार्मिक विधान

Pooja Naik Case: कोट्यवधीची फसवणूक करणाऱ्या 'कॅश फॉर जॉब' प्रकरणातील मास्टरमाईंड पूजा नाईकला जामीन मंजूर

Goa Crime: दोन सह्या करुन विवाह उरकला, काही दिवसातच नवदेवाने विचार बदलला; लैंगिक अत्याचारप्रकरणी फोंड्यातील तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT