Anticancer Fruits Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Anticancer Fruits: महिलांनो कॅन्सला रोखायचे असेल तर 'ही' फळे खावीत

कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी योग्य लाइफस्टाइल आणि आहार असणे गरजेचा आहे.

Puja Bonkile

Anticancer Fruits: कॅन्सर हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. सर्व वयोगटातील लोकांना हा आजार होऊ शकतो. आरोग्य तज्ज्ञांचे मते महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाचा कॅन्सर होऊ शकतो. आनुवंशिकतेसोबतच लाइफस्टाइल आणि आहार देखील योग्य पाहिजे. संशोधकांना असे आढळून आले की काही फळांमध्ये कर्करोगाचा धोका कमी करणारे घटक असतात. कॅन्सरचा धोका कमी करायचा असेल तर आहारात कोणत्या फळांचा समावेश करावा हे जाणून घेऊया.

पपई

संशोधकांच्या संशोधनानुसार पपईमध्ये लाइकोपीन हे घटक आढळते. हे एक प्रकारचे अँटिऑक्सिडेंट आहे, जे मानेच्या आणि स्तनाच्या कर्करोगापासून संरक्षण करते. पपई व्यतिरिक्त, गाजर, टोमॅटो आणि टरबूजमध्ये देखील आढळते. हृदयविकारापासून संरक्षण आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी या फळाचे सेवन फायदेशीर ठरू शकते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे महिलांनी पपईचे सेवन करावे

संत्र

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासठी खुप फायदेशीर असते. तसेच थायामिन, फोलेट आणि पोटॅशियमसारखे अनेक घटक असतात. व्हिटॅमिन सी हे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तसेच कर्करोगाला दूर ठेवते.

द्राक्ष

कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही द्राक्षाचे सेवन करू शकता. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्वे आणि खनिजे असतात. व्हिटॅमिन सी, पोटॅशिअम शरीराला अनेक आजारांपासून वाचवू शकते. यामुळे महिलांनी आपल्या आहारात द्राक्षांचा समावेश करावा.

सफरचंद

सफरचंद खाणे त्वचेसह आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते. यामध्ये फायबर, पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन सी मिळते. जे सर्व कॅन्सरपासून तुमचे संरक्षण करण्यास मदत करते. सफरचंदामध्ये आढळणारे फायबर आतड्यांसंबंधी आजार दूर ठेऊन पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT