Winter Recipe Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Recipe: आरोग्यदायी हिवाळ्यासाठी गाजर हलवा, शेंगदाना चिक्कीसह 'हे' 3 पदार्थ ठरतील फायदेशीर

हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी पुढील पदार्थांचे सेवन करावे.

Puja Bonkile

Winter Recipe: हिवाळ्यात सर्दी-खोकला यासारखे आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात सूप, ड्रायफ्रुट्स आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करावे. तसेच, जर तुम्हाला गोड पदार्थ आवडत असेल तर तुम्ही हिवाळ्यात अनेक गोड पदार्थांचे सेवन करू शकता. जे चवदार आणि आरोग्यदायी देखील असतात. हे गाड पदार्थ कोणते आहेत जाणून घेऊया.

गाजर लाडू

प्रत्येकाने हिवाळ्यात गाजराचा हलवा बनवून खाल्ला पाहिजे. त्यामुळे गाजरचा हलवाच नाही तर तुम्ही गाजराचे छोटे लाडू बनवू शकता.यामुळे शरीर उहदार राहण्यास मदत मिळते.

सुंठ आणि मेथीचे लाडू

सुंठ आणि मेथीचे लाडू हे पारंपारिक गोड असले तरी ते औषध म्हणूनही सेवन केले जाऊ शकते. हे लाडू हिवाळ्यात गरोदर महिलांसाठी खूप फायदेशीर असतात.

गाजर हलवा

हिवाळ्यात गाजर हलवा खाण्याची मज्जा वेगळी असते. यामध्ये ए, बी आणि के ही तिन्ही जीवनसत्त्वे असतात. गाजरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया चांगली होते. गाजर खाल्ल्याने दृष्टीही सुधारते. कॉलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासोबतच ते हृदयासाठी चांगले आहे. गाजरमध्ये बीटा-कॅरोटीन, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. गाजर खाल्ल्याने कॅन्सरचा धोकाही दूर राहतो.

शेंगदाणा चिक्की

गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की खायला अनेक लोकांना आवडते. हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीर उबदार तर राहतेच शिवाय पचनसंस्था देखील सुरळित कार्य करते.

तिळ लाडू

मकर संक्रांती दरम्यान तिळाचे लाडू भरपूर प्रमाणात बनवले जातात आणि खाल्ले जातात. थंडीच्या दिवसात देखील तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT