Pneumonia Symptoms Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Pneumonia Remedies: हिवाळ्यात न्यूमोनियाचा संसर्ग टाळण्यासाठी करा 'हे' उपाय

Winter Pneumonia Symptoms: न्यूमोनियाची लक्षणे कशी ओळखावी आणि प्रतिबंध कसा करावा हे जाणून घेऊया.

दैनिक गोमन्तक

Winter Pneumonia Symptoms: हिवाळा सुरु होताच अनेकजण सर्दी-खोकल्याने हैराण होतात. याकाळात व्हायरल इंफेक्शन वाढते. न्यूमोनियाचाही संसर्ग वाढतो. न्यूमोनिया हा व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होणारा आजार आहे, ज्याचा धोका हिवाळ्यात जास्त असतो. ज्यामुळे फुफ्फुसांना जळजळ होऊ शकते आणि छातीत कफ तयार होऊ शकतो. थंड वातावरणात न्यूमोनिया होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॅक्टेरिया. हिवाळ्यात लहान मुलं आणि वयस्कर लोकांना न्यूमोनियाचा धोका जास्त असतो. व्हायरसमुळे लहान मुलांमध्ये न्यूमोनिया होतो. त्यांना वेळेत उपचार मिळाला तर 10-12 दिवसांत या आजारापासून आराम मिळतो.

Pneumonia Symptoms

तसेच, न्यूमोनिया कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो. पण हिवाळ्यात त्याचा धोका अधिक असतो. हिवाळ्यात सर्दी किंवा फ्लू झाल्यानंतर न्यूमोनिया होऊ शकतो. हा आजार लहान मुले आणि नवजात मुलांमध्ये रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (Virus) नावाच्या विषाणूमुळे होतो. हा एक प्रकारचा फुफ्फुसाचा संसर्ग आहे. या आजाराची लक्षणे वेळीच ओळखली तर त्यावर त्वरित उपचार करता येतात. चला तर या न्यूमोनियाची लक्षणे कशी ओळखावी आणि प्रतिबंधक उपाय कसे करावेत हे जाणून घेऊया.

Pneumonia Symptoms

न्यूमोनियाची लक्षणे

  • श्वास घेताना किंवा खोकताना छातीत दुखणे.

  • मानसिक अस्थिरता येणे.

  • थकवा जाणवणे.

  • ताप येणे, घाम येणे.

  • शरीराचे तापमान सामान्य तापमानापेक्षा कमी होणे.

  • मळमळ, उलट्या.

  • श्वास घेताना त्रास होणे.

  • कफ.

  • भूक न लागणे.

Illness

न्यूमोनियापासून दूर राहण्यासाठी प्रतिबंधक उपाय

  • डॉक्टरच्या सल्ल्याने हॉस्पिटलमध्ये चेकअप करून घ्या आणि औषध घ्या.

  • दोन आठवडे अ‍ॅंटीबायोटिक घेतल्याने हा आजार एक आठवड्यात बरा होतो.

  • न्यूमोनिया आणि फ्लूपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी लस पण उपलब्ध आहेत, त्यामुळे तुम्ही लस घेणे गरजेचे आहे.

  • डॉक्टर 2 वर्षांखालील मुलांसाठी वेगळी न्यूमोनियाची (Pneumonia) लस आणि 2 ते 5 वयोगटातील मुलांसाठी वेगळी लस देण्याची शिफारस करतात.

  • श्वासोच्छवासाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नियमितपणे हात धुवा. हात धुणे शक्य नसेल तर सॅनिटायझर वापरा.

  • धुम्रपान केल्याने रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आणि फुफ्फुसाचे नुकसान होते. त्यामुळे धुम्रपानापासून दूर राहा.

  • पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा आणि पोषक आहार घ्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

तरुणांसाठी 'म्हजी बायल' योजना! दिवाळीनंतर उडणार लग्नांचे बार; सिधुदत्त कामतांचा मजेशीर Video Viral

SCROLL FOR NEXT