Winter Picnic Tips Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Winter Picnic Tips: हिवाळ्यात पिकनिक प्लॅन करताय? मग फॉलो करा 'या' टिप्स

Winter Picnic Tips: हिवाळ्यात गुलाबी थंडीत पिकनिकला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. आल्हाददायक हवामानात, खुल्या आकाशाखाली संपूर्ण कुटुंबासोबत खेळण्याचे, नाचण्याचे, गाण्याचे आणि आपले आवडते पदार्थांचा आस्वाद घेण्याची मज्जाच वेगळी असते.

Puja Bonkile

Winter Picnic Tips: हिवाळ्यात गुलाबी थंडीत पिकनिकला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. आल्हाददायक हवामानात, खुल्या आकाशाखाली संपूर्ण कुटुंबासोबत खेळण्याचे, नाचण्याचे, गाण्याचे आणि आपले आवडते पदार्थांचा आस्वाद घेण्याची मज्जाच वेगळी असते.

हिवाळ्यातील पिकनिक अविस्मरणीय करण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

  1. सर्वात पहिले पिकनिकला जाण्याचा दिवस ठरवावा. प्रत्येकाच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी घरी सहलीचे नियोजन करणे चांगले आहे. जेणेकरून प्रत्येकजण सहभागी होऊ शकेल. दिवस ठरल्यानंतर कुठे जायचे आहे हे ठरवावे. घराजवळ एखादे मोठे उद्यान असेल आणि फिरायला, खेळण्यासाठी मोकळे मैदान, झुले वगैरे असतील तर तिथे जाण्याचा प्लॅन करू शकता. घराभोवती जागा असल्याने वेळेची बचत होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत अधिक वेळ घालवू शकाल.

  2. ठिकाण निश्चित केल्यानंतर पिकनिकसाठी आवश्यक वस्तूंची यादी तयार करावी. जसे की चटई, पिकनिक ब्लँकेट, पेपर टॉवेल, डिस्पोजेबल प्लेट्स, टिश्यू पेपर, फोल्डिंग स्टूल, फोल्ड करण्यायोग्य छत्री किंवा तंबू, हॅन्ड सॅनिटायझर इत्यादी आणि पिकनिक बॅगमध्ये ठेवा.

  3. पिकनिकमध्ये खाद्यपदार्थ आणि पेये सर्वात महत्वाचे असतात. अल्पोपाहार, दुपारचे जेवण आणि संध्याकाळी चहा. प्रत्येक श्रेणीमध्ये, विशेषत: बहुतेक लोकांना आवडत असलेल्या गोष्टींचा समावेश करावा. जसे की चहा, कॉफी, हलका नाश्ता इ. दुपारच्या जेवणात काही जड पदार्थांचा समावेश करावा. जसे की सँडविच, भात, बर्गर. संध्याकाळी जेवणानंतर चहा घ्या. बिस्किटे, वेफर्स, चिप्स, मफिन्स यांसारखे पदार्थ सोबत ठेवावे. सोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि मध्येच मुलांना अल्पोपहार देण्यासाठी चॉकलेट, ज्यूस, चिप्स इ. सोबत घ्यावे.

  4. नियोजन आणि व्यवस्थेनंतर आता संपूर्ण लक्ष पिकनिकच्या दिवशी, किती वाजता निघायचे, वाटेत कुठेही थांबायचे की नाही या गोष्टींचे प्लॅनिंग करावे.

  5. पिकनिक स्पॉटवर पोहोचल्यानंतर एक स्वच्छ जागा शोधावी आणि तेथे चटई आणि चादरी पसरवून बसावे. जर तुम्ही फोल्ड करण्यायोग्य टेंट आणला असेल तर तो सेट करावा.

इतर गोष्टी ठेवा लक्षात

जर तुम्हाला काही नवीन गेम समावेश करायचे असतील तर तुम्ही त्यात लीफ कलेक्शन समाविष्ट करू शकता. यामध्ये वेगवेगळ्या रंगांची पाने ठराविक वेळेत शोधावी लागतात.

ज्याला सर्वात जास्त रंगांची पाने सापडतील तो विजेता ठरतो. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास पतंग उडवण्याची स्पर्धाही घेता येईल. जे खूप मजेदार आहे.

घरी बनवलेले खाद्यपदार्थ सोबत ठेवा.

हिवाळ्यात पिकनिकला गेल्यावर उबदार( स्वेटर, टोपी) यासारखे कपडे सोबत ठेवावे.

खाद्यपदार्थ, पेये आणि इतर गोष्टी वेगळ्या बॅगमध्ये ठेवा. एकत्र ठेवल्यास तेल आणि मसाल्यांवर इतर गोष्टींवर डाग पडण्याची शक्यता असते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आपल्यासोबत प्रथमोपचार किट ठेवण्यास विसरू नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Governor: सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरुन वक्तव्य; गोव्याचे राज्यपाल पिल्लई यांच्या विरोधातील FIR रद्द

Goa Exposition: सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट? PFI च्या चार सदस्यांची कसून चौकशी

Goa Crime: नोएडाच्या महिलेला मारहाण करुन विनयभंग; तामिळनाडूच्या आरोपीला दोन वर्षे कारावासाची शिक्षा

Saint Francis Xavier Exposition: "सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे पवित्र शव म्हणजे दैवी चमत्कार": फादर हेन्री फाल्काओ

Saint Francis Xavier Exposition In Pictures: ओल्ड गोव्यात एक्सपोझिशनला सुरुवात; पाहा पहिल्याच सोहळ्याचे खास फोटो

SCROLL FOR NEXT