Hair Care: Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hair Care: केसांमध्ये तेल लावताना 'या' चुका करणे टाळा

केसांना तेलाने मसाज करणे फायदेशीर असते.

दैनिक गोमन्तक

केसांची समस्या आजकाल सामान्य आहे. मग तो मुलगा असो की मुलगी, पुरुष असो की स्त्री, आजकाल केसांची समस्या अशी आहे की प्रत्येकजण त्याला तोंड देत आहे. केसांच्या समस्यांची दोन कारणे आहेत. पहिली खराब जीवनशैली आणि दुसरी तुमची केसांची निगा राखण्याची दिनचर्या कशी आहे. तुमच्या केसांची निगा राखण्याची दिनचर्या तुमच्या केसांवर मोठ्या प्रमाणात परिणाम करते. केसांना निरोगी ठेवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची केसांची निगा राखली पाहिजे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. केसांना तेल कधी आणि कसे लावावे? हे जाणून घेउया.

ओल्या केसांना तेल लावावे की नाही? उत्तर असे आहे की जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा तुमचे केस किंवा टाळू स्वच्छ असावे. खराब केसांना कधीही तेल लावू नका. घाण झालेल्या टाळूला तेल लावण्याची चूक अनेकजण करतात. असे केल्याने केसांना योग्य पोषण मिळत नाही. जर तुम्ही केस धुत असाल तर रात्रभर तेल लावून ठेवा किंवा केस धुण्याच्या 1-2 तास आधी केसांना तेल लावणे देखील खूप फायदेशीर आहे. 

  • ओल्या केसांना तेलाने हलकी मसाज करावी

ओल्या केसांना तेल लावल्यास बदामाचे तेल लावावे. कारण जर तुम्ही जाड आणि जड तेल वापरलं तर ते टाळूवर एक थर तयार होईल. 

  • कोरड्या केसांना तेलाने चांगली मसाज करावी

केस कोरडे असतील तर खोबरेल तेल लावा. कारण खोबरेल तेल कोरड्या केसांसाठी चांगले असते. कोरड्या केसांवर खोबरेल किंवा मोहरीचे तेल लावणे योग्य आहे. 

  • केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत

केसांना तेल लावताना खूप कोमट तेल वापरा जेणेकरून ते लवकर टाळूमध्ये जाईल.

संपूर्ण केसांमध्ये मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा.

टाळूवर तेलाने चांगली मसाज करावी.

केसांना हलक्या हाताने मसाज करा.

जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे विचरावे.

हे आठवड्यातून दोनदा करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test: अवघ्या दोन धावांनी हुकलं शतक, शुभमन गिलच्या नावावर नकोसा रेकॉर्ड! धोनी-विराटच्या यादीत समावेश

Couple Assault Viral Video: फोटो काढणाऱ्या जोडप्याला अश्लील शेरेबाजी, बेदम मारहाण, 8 अल्पवयीन मुले ताब्यात; मुंबईतील खळबळजनक व्हिडिओ व्हायरल

Agniveer Recruitment Data Leak: मोठी खळबळ! अग्निवीरांचा डेटा डार्क वेबवर विकायचा डाव? 14 वर्षांच्या मुलाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात

Railways New Rules: प्रवाशांनो सावधान! ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात बोलणे पडू शकते महागात; न ऐकल्यास भोगावा लागू शकतो तुरुंगवास अन् दंड

Check Dam Construction: 3 तालुक्यांत 116 बंधाऱ्यांत पाणी अडवले; परिसरातील भूजल पातळीत वाढ झाल्याचा दावा

SCROLL FOR NEXT