Trifala Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Trifala: हिवाळ्यात त्रिफळा खाल्ल्यास सर्दी-खोकला राहील दूर

त्रिफळा ही एक औषधी वनस्पती असून हिवाळ्यात याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Puja Bonkile

Trifala: हिवाळा सुरू झाला असून सर्दी-खोकल्यासारखे आजार डोकंवर काढतात. यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात त्रिफळा खाल्ल्याने सर्दी, खोकला, ताप पोटदुखी यासारख्या अनेक समस्यांपासून बचाव होतो. त्रिफळा हे अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया त्याचे फायदे कोणते आहेत.

  • सर्दी आणि खोकल्यापासून सुटका


सर्दी आणि खोकला ही हिवाळ्यात होणारी एक सामान्य समस्या आहे. जी आपल्याला सतत त्रास देत असते. त्रिफळा ही एक औषधी वनस्पती आहे. जी आपल्या स्वयंपाकघरात क्वचितच वापरली जाते. परंतु  सर्दी-खोकल्यामुळे घसा खवखवणे, नाक बंद होणे, डोकेदुखी आणि ताप यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

  • रोगप्रतिकारशक्ती वाढवते


त्रिफळामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासारखे अनेक घटक असतात. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. हे पांढऱ्या रक्त पेशी, प्रतिपिंड आणि टी-पेशींची संख्या वाढवून आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. अशाप्रकारे, दररोज त्रिफळा सेवन केल्याने आपल्याला संक्रमण आणि रोगांपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत होते. 

  • वजन कमी करते


त्रिफळामध्ये असलेले काही घटक वजन कमी करण्यास मदत करतात. तुम्ही नियमितपणे त्रिफळाचे सेवन केले तर वजन नियंत्रणात राहू शकते.

  • पचनशक्ती


त्रिफळा हा पचनशक्ती वाढवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. यामध्ये असलेले गुणधर्म पोटाच्या समस्या दूर ठेवतात. तसेच पचनक्रिया मजबूत ठेवतात. त्यामुळे आतापासून रोज एक चमचा त्रिफळा चूर्ण पाण्यासोबत घेतल्याने पचनक्रिया सुरळित कार्य करते. 

  • केस आणि त्वचा


त्रिफळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे त्वचेच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात. हे त्वचेचा रंग आणि टोन सुधारण्यास मदत करते. त्रिफळा केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे केस मजबूत करते, केस गळणे थांबवते आणि चमक देखील वाढवते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT