Wi-Fi Speed Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Wi-Fi Speed: घरात 'या' ठिकाणी सेट करा राउटर, वाढेल वाय-फाय स्पीड

Wi-Fi Speed: राउटर योग्य ठिकाणी सेट करूनच रेंजची समस्या कमी होऊ शकते. घरातील कोणत्या ठिकाणी राउटर ठेवल्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चांगला वेग मिळू शकतो हे जाणून घेऊया.

Puja Bonkile

wifi speed best place for router to have better signal read full story

अनेक लोक घरात वाय-फॉयला स्पीड येत नाही असी तक्रार करतात. पण तुम्हाला माहिती आहे का असे का होते? तुम्ही जर वायफाय राउटर योग्य टिकाणी ठेवले नसेल तर योग्य स्पीड मिळत नाही. यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

मध्यभागी

मध्यभागी ठेवल्याने कोणत्याही वस्तुंचा अडथळा त्या निर्माण होत नाही. यामुळे ऑफिस आणि घरात वायफाय राउटर मध्यबागी ठेवावा.

उंच ठिकाणी

घरात किंवा ऑफिसमध्ये राउटरला नेहमी उंच ठिकाणावर ठेवावे. जसे की शेल्फ किंवा टेबलवर, जेणेकरून सिग्नलवर अडथळ्यांचा कमी परिणाम होईल किंवा राउटर भिंतीवर लावण्यासाठी तुम्ही वॉल माउंटचाही वापर करू शकता. राउटरला उंच भागावर ठेवण्यासाठी स्टँड वापरा.

मेटलपासून दूर ठेवा

राउटरला रेफ्रिजरेटर किंवा मायक्रोवेव्हसारख्या धातूच्या वस्तूंपासून दूर ठेवावे. कारण ते सिग्नल कमकुवत करू शकतात. तसेच, वायफाय राउटर खिडकी किंवा आरशासारख्या परावर्तित पृष्ठभागाजवळ नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे सिग्नल बाउन्स होऊन अडथळा निर्माण होतो.

उंच ठिकाणी

घरात किंवा ऑफिसमध्ये राउटरला नेहमी उंच ठिकाणावर ठेवावे. जसे की शेल्फ किंवा टेबलवर, जेणेकरून सिग्नलवर अडथळ्यांचा कमी परिणाम होईल किंवा राउटर भिंतीवर लावण्यासाठी तुम्ही वॉल माउंटचाही वापर करू शकता. राउटरला उंच भागावर ठेवण्यासाठी स्टँड वापरा.

घरातील या ठिकाणी राउटर ठेवल्यास Wifi वाढेल स्पीड

मोकळ्या जागेत ठेवा

भिंती किंवा फर्निचरपासून दूर असलेल्या मोकळ्या जागेत राउटर ठेवावे. जेणेकरून सिग्नल संपूर्ण खोलीत सहज पसरेल. तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर राहत असाल तर तुम्ही वायफाय राउटर मध्यभागी कुठेतरी ठेवावे. राउटर खोलीच्या आत नव्हे तर केवळ मोकळ्या जागेत ठेवावे.

राउटर अपडेट करा

उत्तम कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षिततेसाठी राउटरचे फर्मवेअर नियमितपणे अपडेट करत रहावे. वायफाय राउटरवरून चांगली कनेक्टिव्हिटी आणि वेग मिळवण्यासाठी इतर काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जसे की राउटरच्या अँटेनाची दिशा काय आहे. फर्मवेअर अपडेट केले आहे की नाही. तसेच राउटर किती जुना आहे. अशा गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

जास्त स्पीड हवी असेल तर काय करावे

जर तुमच्या घराचे क्षेत्रफळ मोठे असेल तर तुम्ही वायफाय एक्स्टेन्डर किंवा मेश नेटवर्क वापरू शकता.

तुमच्या घरात अनेक वायफाय डिव्हाइसेस असल्यास, तुम्ही 5GHz बँड वापरू शकता. जो 2.4GHz बँडपेक्षा कमी गर्दीचा आहे.

तुम्हाला तुमच्या वायफाय सिग्नलमध्ये समस्या येत असल्यास, तुम्ही वायफाय विश्लेषक ॲप वापरून समस्या दूर करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Anganwadi Goa News: तान्हुल्याच्या संगोपणाची चिंता मिटली! केंद्रीय योजनेतून 9 तालुक्यांमध्ये अंगणवाडीत पाळणा घरांची व्यवस्था

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: 'कॅश फॉर जॉब' घोटाळ्याची व्यापती वाढली; दीपश्रीचा आणखी एक कारनामा समोर

Yuri Alemao: तरुणांना प्रोत्साहन देण्यात कला, संस्कृती खातं अपयशी; युरी आलेमाव यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT