General Knowledge Dainik Gomantak
लाइफस्टाइल

General Knowledge: साधू भगवे अन् पांढरी वस्त्रच का करतात धारण ?

नेमकी ही वेगवेगळी वस्त्र का परिधान केली जातात तुम्हाला माहिती आहे का?

दैनिक गोमन्तक

Why Monk Wear Orange, Black Or White Clothes: जेव्हा देशभरातले साधूसंत कुंभमेळ्यात हजेरी लावतात तेव्हा कोणी भगव्या वस्त्रात तर कोणी काळ्या वस्त्रात तर कोणी पांढऱ्या शुभ्र वस्त्रात हजेरी लावतात.

मग नेमकी ही वेगवेगळी वस्त्र का परिधान केली जातात. हिंदू धर्मात मोठमोठे साधू किंवा ऋषी होऊन गेले. आजही साधू किंवा ऋषीमुनींना हिंदू धर्मात महत्वाचे स्थान आहे. मात्र साधूसंत म्हटले की भगवे वस्त्र धारण केलेले मुनी असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे पाहते.

भारतात कुंभमेळा म्हणजे साधूसंतांचे अगदी हक्काचे स्थान. पण आपल्या सभोवती पाहायला मिळणारे साधू भगव्या वस्त्रात असतात, पण जेव्हा देशभरातले साधूसंत अशा कुंभमेळ्याल्या हजेरी लावतात तेव्हा मात्र कोणी भगव्या वस्त्रात, कोणी काळ्या वस्त्रात तर कोणी चक्क पांढऱ्या वस्त्रात हजेरी लावतात. मग नेमकी ही वेगवेगळी वस्त्र का परिधान केली जातात याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

  • पांढरी वस्त्र धारण करण्यामागचे कारण

पांढरा (White) रंग मनाला शांती देणारा असतो. हिंदू धर्म या देशातला सर्वात जुना धर्म आहे. त्यानंतर बौद्ध आणि जैन धर्म अस्तित्वात आला. जैन धर्मातल्या साधूंचे दोन पंथ आहेत. एक दिगंबर पंथ. या पंथातले साधू आयुष्यभर अंगावर एकही कपडा घालत नाहीत. दुसरे श्वेतांबर. श्वेत म्हणजेच पांढरा. त्यामुळे हे साधू नेहमी आपल्याला पांढऱ्या कपड्यात पाहायला मिळतात.

  • भगवे वस्त्र धारण करण्यामागचे कारण

हिंदू संस्कृतीत भगवा रंग हा त्यागाचा किंवा शौर्याचं प्रतिक मानले जाते. पण भगवा रंग हा एकाग्रतेचे प्रतिकही मानले गेले आहे. यामुळे भगवे कपडे (Cloths) घातल्याने मनावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते आणि मन शांत राहाते असे सांगितले गेले आहे. त्यामुळे हे साधू भगवी वस्त्र धारण करतात.

  • काळे वस्त्र धारण करण्यामागचे कारण

काळे वस्त्र धारण करणारे या साधू तंत्र मंत्र साधनेत अत्यंत निष्णात असतात. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि कपाळी भस्म ही त्यांची आणखी एक ओळख असते.अनेकदा हे साधू आपण असाध्य रोग बरे करु शकतो असा दावाही करताना पाहायला मिळतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT