Bun Hairstyle: आजकाल सगळ्या मुली कार्यक्रमामध्ये बन हेअरस्टाईला प्राधान्य देतात. लग्नसमारंभ आणि पार्ट्यांमध्ये मुली वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल बनवतात. ही हेअरस्टाईल कॅज्युअल आणि पार्टी अशा दोन्ही फंक्शन्समध्ये चांगली दिसते.
पण कधीकधी बन स्टाईल प्रत्येकाच्या चेहऱ्यावर (Face) चांगली दिसत नाही. वास्तविक याचे कारण चेहऱ्याचा आकार आहे. जर आपण चेहऱ्याच्या आकारानुसार हेअरस्टाईल केली तर आपण आपला लुक आणखी आकर्षक बनवू शकतो. काहीवर हेवी हाय बन सूट तर काहींच्या चेहऱ्यावर लो मैसी बन शोभून दिसतो. चला तर मग जाणून घेउया की कोणत्या प्रकारचा बन हेअरस्टाईल चांगला दिसतो.
१. स्क्वायर शेप फेस
सर्व हेअरस्टाईल स्क्वायर शेप फेसला अनुरूप नाहीत. त्यांच्या कपाळाची आणि जबड्याची रेषा सामान्यतः सारखीच असते, त्यामुळे त्यांनी हेवी हाय बन आणि लो मैसी बन टाळावा. साइड स्वीप्ट किंवा साइड बॅंग्ससह बनवलेला गोंधळलेला बन त्यांच्यावर खूप स्टाइलिश दिसतो.
२. राउंड शेप फेस
लहान आणि घट्ट बन्स गोल आकाराच्या चेहऱ्याला अजिबात शोभत नाहीत. एक लेयर्ड हाई मैसी त्यांना खूप चांगला शोभतो. यामुळे त्यांचे केस दाट आणि चेहरा लांब दिसतो.
३. ओवल शेप फेस
ओव्हल चेहऱ्याचा आकार चेहऱ्याच्या रुंदीपेक्षा लांब असतो. बन हेअरस्टाइलबद्दल (Hair Style) बोलायचे झाले तर तुम्ही या प्रकारच्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करू शकता. तुम्ही साइड बॅंग्स बन, हाय बन, लो बन आणि इतर अनेक बन डिझाईन्स देखील स्टाइल करू शकता.
४. हार्ट शेप फेस
मिड हाइड बन, म्हणजेच चेहऱ्याच्या उंचीच्या अगदी मध्यभागी बनवलेला बन, हृदयाच्या आकाराच्या चेहऱ्याला शोभतो. यासाठी तुमचे केस मध्यभागी पार्टिंग करा.
५. लॉन्ग शेप फेस
या प्रकारचा चेहरा (Face) अंडाकृती किंवा त्यापेक्षा लांब असतो. त्याला आयताकृती चेहरा देखील म्हटले जाऊ शकते. चेहर्याचा लांब आकार रुंद दिसण्यासाठी, मानेकडे लटकलेला आणि सैल असलेला लूज बन बनवा. यामुळे तुमच्या चेहऱ्याची उंची संतुलित दिसेल.
६. डायमंड शेप फेस
डायमंड आकार चेहरा संतुलित करण्यासाठी गालाची हाडे कमी हायलाइट करणे आवश्यक आहे. तुम्हाला तुमचे कपाळ रुंद दिसावे यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही बॅंग्ससह मैसी बन स्टाईल करू शकता. ही स्टाईल तुम्हाला छान दिसेल.
सणासुदीला (Festival) आवर्जून पारंपरिक कपडे घालते जातात. सुंदर दागिने, मेकअपही केला जातो. यासोबत हेअरस्टाईलचीही खास काळजी घेतली जाते. कारण हेअरस्टाईल चुकली तर पूर्ण लूक चुकतो. यामुले वर सांगितल्याप्रमाणे हेअरस्टाईल करावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.