WhatsApp New Feature Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपच हे नव फिचर लयच दमदार, आता व्हिडिओ कॉल सुरू असताना शेअर करू शकाल ऑडिओ

इन्स्टंट मॅसेजिंग अ‍ॅप WhatsApp आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन फिचर लाँच करणार आहे.

Puja Bonkile

WhatsApp New Feature: इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप म्हणून ओळखले जाणारे WhatsApp आपल्या यूजर्ससाठी आणखी एक नव फिचर लाँच करणार आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स व्हिडिओ कॉल सुरू असताना म्युझिक, ऑडिओ शेअर करू शकणार आहे.

सध्या, या फिचरवर काम सुरू आहे आणि ते अद्याप बीटा टेस्टरसाठी देखील तयार नाही. याचा अर्थ हे फिचर तुमच्यापर्यंत येण्यासाठी अद्याप बराच वेळ लागणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपने यावर्षी अनेक फीचर्स यूजर्ससाठी आणले आहेत.

  • या फिचरचा फायदा काय

नवीन फीचरमध्ये यूजर्स स्क्रीन-शेअरिंग दरम्यान व्हिडिओ कॉलवर संगीत ऑडिओ देखील शेअर करू शकणार आहेत. व्हिडिओ कॉलमध्ये उपस्थित असलेले प्रत्येकजण हा ऑडिओ एकाच वेळी ऐकू शकणार आहेत. हे फिचर यूजर्सला नवा अनुभव देईल आणि ते परस्परसंवादाचे वातावरण देखील उत्साही बनवेल. सध्या व्हॉट्सअ‍ॅप iOs साठी त्याचा बीटा व्हर्जन आणणार असून नंतर अँड्रॉइड यूजर्स त्याचा लाभ घेऊ शकणार आहेत

  • वेब यूजर्सना लवकरच चॅट फिल्टरलचा घेता येणार लाभ

एका नवीन अपडेटमध्ये व्हाट्सअॅप वेब यूजर्ससाठी एक नवीन चॅट फिल्टर आणत आहे, ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या गरजेनुसार संभाषणांचे वर्गीकरण करू शकणार आहेत. या फीचरमध्ये युजर्सना चॅटवर ऑल, अनरीड, ग्रुप आणि कॉन्टॅक्ट्सचे फिल्टर्स मिळतील, जिथे टॅप करून यूजर्स त्यांच्या गरजेनुसार चॅट निवडू शकतील. सध्या, हे फिचर WhatsApp वेबच्या बीटा व्हर्जनच्या काही यूजर्ससाठी उपलब्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: आरोग्यमंत्री राणेंनी घेतली फडणवीसांची भेट; विजयाबद्दल केले अभिनंदन

Ranbir Kapoor at IFFI 2024: आलियाने विचारलं" किशोर कुमार कोण आहे?" रणबीरने सांगितला पहिल्या भेटीचा किस्सा; Video Viral, चाहते नाराज

Corgao: सरपंच निवड हा पंचायतीचा विषय! कोरगाववासीय नाईक यांच्या पाठीशी; धार्मिक वादाला विरोध

Her Story Her Screen महिला सबलीकरणाला समर्पित! IFFI चे सकारात्मक पाऊल

Saint Francis Xavier Exposition: शब्द नाही भाव महत्वाचा, सेंट झेवियर यांनी ऐकली हावभावांची प्रार्थना; गोव्यात पहिल्यांदाच माससाठी सांकेतिक भाषेचा वापर

SCROLL FOR NEXT