WhatsApp Update Dainik Gomantak
लाइफस्टाइल

WhatsApp Update: व्हॉट्सअपचे नवे फिचर लवकरच होणार लाँच, व्हिडिओ स्टेटसची मजा होईल द्विगुणित

WhatsApp New Update: व्हॉट्सअपचे नवे फिचर लवकरच लाँच होणार आहे. यामुळे व्हिडिओ स्टेटसची मजा द्विगुणित होणार आहे.

Puja Bonkile

WhatsApp is rolling out new updates to share video status on minute

व्हॉट्सॲप हे इंस्टट मॅसेजिंग अॅप आपल्या यूजर्ससाठी नवनवे फिचर लाँच करत असते. तुम्हाला व्हॉट्सॲप व्हिडिओ स्टेटस अपलोड करायला आवडत असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सॲप स्टेटस अपडेट्सबाबत एका नवीन आणि महत्त्वाच्या फीचरवर काम करत आहे. व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरची बीटा टेस्टिंगही सुरू झाली असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे.

1 मिनिटांचा व्हिडिओ

आता तुम्ही स्टेटसमध्ये 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करू शकता. व्हॉट्सॲपने बीटा यूजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे, ज्यानंतर ते स्टेटसमध्ये 1 मिनिटापर्यंतचे व्हिडिओ अपलोड करण्यास सक्षम आहेत. सध्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये फक्त 30 सेकंदांचा व्हिडिओ अपलोड करता येतो. पण नवीन अपडेटनंतर तो 1 मिनिटाचा व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.

व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरची चाचणी अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.24.6.19 वर केली जात आहे. नवीन अपडेटसाठी, बीटा वापरकर्ते त्यांचे व्हॉट्स ॲप गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकतात. हे नवीन अपडेट लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल, कारण बऱ्याच वेळा स्टेटसमध्ये मोठे व्हिडिओ अपलोड करायचे असतात परंतु ते करू शकत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT