World Malaria Day 2023 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

World Malaria Day 2023: मलेरिया दिवस का अन् केव्हा सुरू झाला, वाचा एका क्लिकवर

मलेरिया या आजारामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होतो.

दैनिक गोमन्तक

World Malaria Day 2023: दरवर्षी 25 एप्रिल हा दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा केला जातो. हा आजार संक्रमित मादी अॅनोफिलीस डासांच्या चाव्याव्दारे होतो. पाऊसाळ्यात हा आजार अधिक पसरतो.

मलेरियाची काही सामान्य लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, उलट्या, थंडी वाजून येणे, थकवा, चक्कर येणे आणि पोटदुखी. मलेरियाच्या उपचारात साधारणपणे दोन आठवडे औषधे घ्यावी लागतात.

या आजाराकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. भारतात दरवर्षी मलेरियाचे हजारो रुग्ण आढळतात आणि मलेरियामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होतो. मलेरियाचे गांभीर्य आणि ते कसे टाळावे याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी मलेरिया दिन साजरा केला जातो.

  • कधीपासून झाली सुरुवात?

जागतिक मलेरिया दिन 25 एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. हा दिवस 2007 पासून साजरा करण्यास सुरुवात झाली.

  • काय आहे इतिहास?

आफ्रिकन देशांमध्ये पहिल्यांदा मलेरिया दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी आफ्रिकन देशांमध्ये मलेरिया हे मृत्यूचे एक कारण होते आणि या मृत्यूंची आकडेवारी कमी करण्याच्या उद्देशाने जागतिक मलेरिया दिन सुरू करण्यात आला.

  • मलेरिया दिन साजरा करण्याचा उद्देश

2007 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने एका बैठकीत हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. जेणेकरून लोकांचे लक्ष या धोकादायक आजाराकडे वेधले जावे आणि मलेरियाबाबत लोकांना जागरूक करता येईल.

  • यंदाची थीम

दरवर्षी जागतिक आरोग्य संघटना मलेरिया दिनाच्या विशेष थीमवर कार्यक्रम आयोजित करते. या वर्षी मलेरिया दिन 2023 ची थीम 'रेडी टू कॉम्बॅट मलेरिया' अशी आहे. या थीमचा उद्देश लोकांना मलेरियाचा सामना करण्यासाठी तयार राहण्यासाठी जागरूक करणे हा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT