Hanuman Jayanti 2022 Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Hanuman Jayanti 2023: हनुमानाच्या डोक्यावर नाही तर पायावर करा तेल अर्पण

हनुमानाच्या डोक्यावर तेल अर्पण न करता तर त्याच्या पायावर तेल अर्पण करावं.

दैनिक गोमन्तक

Hanuman Jayanti 2023: आज जगभरात हनुमान जयंतीचा साजरा करणार आहोत. बरेच लोकं हनुमानाच्या देवळात गेल्यावर त्याच्या डोक्यावर तेल अर्पण करतात.

पण असे न करता त्याच्या पायावर तेल अर्पण करावे. याबाबत अधिक माहिती आपण करून घेणार आहोत. या मागची कथा काय आहे हे जाणुन घेउया.

  • हनुमानाच्या पायावर तेल का अर्पण करावं

एकदा हनुमान एका गुहेत ध्यानस्थ अवस्थेत बसले होते आणि त्यांच्या तोंडी रामनामाचा जप होता. ते पाहून तिथे शनिदेव आले आणि त्यांनी हनुमानाला पुढची साडेसात वर्ष त्यांना साडेसातीचा काळ भोगावा लागणार असल्याचे सांगितले.

त्यावर चतुर हनुमानाने त्यांना आपण रामाचे भक्त आहोत आणि रामभक्तावर साडेसातीचा कोणताही प्रभाव पडत नसल्याचं सांगितलं. हे ऐकून शनिदेव संतप्त झाले आणि त्यांनी हनुमानाला युद्धाचं आव्हान दिलं.

हनुमान आणि शनिदेव यांच्या युद्धात शनिदेव सहज पराभूत झाले. सलग सातवेळा शनिदेव पराभूत झाले मात्र त्यांचा क्रोध काही केल्या शांत होत नव्हता. अशात त्यांनी आठव्यांदा हनुमानाला युद्धाचं आव्हान दिलं. मात्र त्याच वेळेस हनुमानाने शनिदेवाला आपल्या पायाच्या अंगठ्यानं दाबून टाकले.

काही केल्या हनुमानाच्या पायाच्या अंगठ्याखालून शनिदेवांना निसटता येईना. हे पाहून त्यांनी ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांना आवाहन केले.

मात्र यांनीही असमर्थता दर्शवली. हनुमानाच्या अंगठ्याच्या खालून निसटण्याचा प्रयत्न करताना एव्हाना शनिदेवांच्या त्वचेची लाही झाली. मग शनि देवांनी भक्तांचा धावा सुरू केला. भक्तांनी शनिदेवांवर तेल ओतलं आणि त्याने शनिदेव प्रसन्न झाले.

सरतेशेवटी शनिदेवांनी हनुमानाचा धावा केला आणि त्यांना पुन्हा त्रास देणार नाही असं वचन दिलं. त्या वचनानंतर मारूतीने त्यांची सुटका केली. माझ्या भक्तांकडेही वाकड्या नजरेनं पाहू नकोस असं वचन हनुमानाने शनिदेवाकडून घेतले.

त्यामुळे हनुमानाच्या मंदिरात गेल्यावर हनुमानाच्या डोक्यावर नाही तर शनिसाठी हनुमानाच्या पायावर तेल अर्पण करावे हे लक्षात घेतलं पाहिजे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohammed Siraj: "जा, रिक्षा चालव!", एका अपयशाने 'हिरो' ते 'झीरो'? मोहम्मद सिराजने नेटिझन्सच्या दुटप्पी भूमिकेवर सोडले मौन, म्हणाला...

दोघांमधील भांडण विकोपाला गेले, पत्नीने रागाच्या भरात पतीच्या अंगावर कढईतील उकळते तेल ओतले

Goa News Live: काँग्रेसच्या नेत्यांनीच केले होते विरियातोंविरोधात काम!

'आर्मीकडून 4 लाख महिलांवर सामूहिक लैंगिक अत्याचार, ऑपरेशन सर्चलाईटमध्ये नरसंहार'; भारतानं युएनमध्ये उघडे पाडले पाकिस्तानचे क्रौर्य

Goa Crime: दुचाकी चोरणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; कर्नाटकातील दोन युवकांना अटक, वास्को पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT