Benefits of Taking Steam Bath Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Benefits of Taking Steam Bath: स्टीम बाथचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का? नक्की घ्या जाणून

स्टीम रूममध्ये आंघोळ केल्याने चेहऱ्याची छिद्रे उघडतात आणि त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात.

दैनिक गोमन्तक

Benefits of Taking Steam Bath: आपल्या जीवनशैलीत खूप बदल होत आहेत. रोज आपली जगण्याची पद्धत बदलत आहे. खाण्यापिण्यापासून ते झोपेपर्यंत आणि बसण्यापर्यंतच्या कामांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत.

आंघोळीची पद्धतही बदलली आहे. थकवा दूर करण्यासाठी आणि शरीराला आराम देण्यासाठी अनेक लोक कोमट पाण्याने अंघोळ करतात.

स्टीम बाथकडेही कल वाढला आहे. आजकाल स्टीम रूम बाथ देखील खूप फायदेशीर मानले जाते. याचे अनेक फायदे आहेत. जाणून घेऊया..

स्टीम रूम बाथ म्हणजे काय?

स्टीम रूम ही एक छोटी खोली असते. ज्यामध्ये पाणी उकळून आंघोळीसाठी वाफ तयार केली जाते. स्टीम रूमचे तापमान साधारणपणे 110°F असते. अशा स्टीम रूम जिम किंवा स्पामध्ये असते.

स्टीम बाथचे फायदे:

  • त्वचा चमकदार होते

स्टीम रूममध्ये आंघोळ केल्याने चेहऱ्याची छिद्रे उघडतात आणि त्वचेतील विषारी घटक बाहेर पडतात. त्यामुळे आपली त्वचा चमकू लागते. स्टीम बाथ त्वचेला चमकदार बनवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

  • रोगप्रतिकारक शक्ती वाढते

स्टीम रूममध्ये आंघोळ करून शरीराला कोमट पाण्याच्या संपर्कात आणल्याने ल्युकोसाइट्स उत्तेजित होतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला संसर्गाशी लढण्यास मदत होते. तसेच सर्दी झाल्यास, स्टीम बाथ घेणे फायदेशीर आहे.

  • तणाव दूर होतो

स्टीम बाथमुळे शरीरातील कोर्टिसोलचे उत्पादनही कमी होते. हा तणाव वाढवणारा हार्मोन आहे. स्टीम बाथमध्ये काही मिनिटे आरामशीर अवस्थेत घालवल्याने तुमचे आरोग्य सुधारते, तसेच तुमचे मन आरामशीर होते. त्यामुळे तणाव दूर होतो.

  • रक्त परिसंचरण

स्टीम बाथ घेतल्याने तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावरही परिणाम होतो. ते तुम च्या हृदयासाठी चांगले आहे. ही आर्द्र उष्णता रक्ताभिसरणाची स्थिती सुधारते. यासोबतच स्टीमबाथमुळे अनेक समस्या दूर होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Goa News Live Updates: महिना उलटला पण कचरा तसाच

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

SCROLL FOR NEXT