Proton Arc Therapy Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Proton Arc Therapy: कर्करोगाच्या उपचारात प्रोटॉन आर्क थेरपी ठरणार 'गेमचेंजर', संशोधनातून खुलासा; जाणून घ्या कशी ठरणार फायदेशीर?

Cancer Treatment Breakthrough: आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक तंत्र विकसित केले आहे, जे कर्करोगावर उपचार करु शकते. या तंत्राला स्पॉट-स्कॅनिंग प्रोटॉन आर्क थेरपी (SPARc) असे नाव देण्यात आले आहे.

Manish Jadhav

देशात गेल्या काही वर्षात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार 2023 मध्ये भारतात कर्करोगाचे 14 लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळले. पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचे आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराचे रुग्ण वाढत असताना नवीन उपचार पद्धती देखील येत आहेत. आता अमेरिकन शास्त्रज्ञांनी एक तंत्र विकसित केले आहे, जे कर्करोगावर उपचार करु शकते. या तंत्राला स्पॉट-स्कॅनिंग प्रोटॉन आर्क थेरपी (SPARc) असे नाव देण्यात आले आहे.

अमेरिकेत झालेल्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये या तंत्राचा यशस्वी वापर करण्यात आला आहे. या तंत्रात प्रोटॉन बीम वापरण्यात आले आहेत. हे कर्करोगाच्या रुग्णाच्या शरीरातील ट्यूमर अत्यंत अचूकतेने नष्ट करतात. जरी हे अद्याप एक चाचणी आहे, परंतु हे उपचार आशेचा किरण देत आहेत. या थेरपीवरील संशोधन इंटरनॅशनल जर्नल ऑफ पार्टिकलमध्ये प्रकाशित झाले आहे.

प्रोटॉन आर्क थेरपी कशी वेगळी आहे?

दरम्यान, या थेरपीचे इतर थेरपींपेक्षा कमी दुष्परिणाम आहेत. रेडिओ आणि केमोथेरपीसारख्या इतर थेरपींमध्ये ट्यूमरच्या सभोवतालच्या निरोगी पेशींना देखील रेडिएशनचा सामना करावा लागतो. रुग्णाला केस गळणे, थकवा, जळजळ, वेदना आणि उलट्या यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. दुसरीकडे, प्रोटॉन आर्क थेरपीमध्ये केवळ कर्करोगाच्या पेशींवर हल्ला केला जातो आणि त्याच्या आसपासच्या पेशींवर परिणाम होत नाही. मेंदू, डोळा किंवा पाठीच्या कण्यामध्ये होणाऱ्या ट्यूमरसाठी ही पद्धत विशेषतः फायदेशीर आहे.

सामान्य लोकांना लवकर फायदा मिळणार!

संशोधनात सहभागी असलेले शास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट थेम सांगतात, सध्या केवळ क्लिनिकल चाचण्या सुरु आहेत, परंतु येणाऱ्या काळात आर्क थेरपी कर्करोगाच्या उपचारात एक मोठी गेमचेंजर ठरु शकते. सध्या ही पद्धत मर्यादित केंद्रांमध्ये वापरली जात आहे, परंतु संशोधन जसजसे पुढे जाईल तसतसे ती अधिकाधिक रुग्णांवर वापरली जाईल. जर ती पूर्णपणे यशस्वी ठरली तर येणाऱ्या काळात कर्करोगाच्या (Cancer) उपचारात एक नवीन क्रांती होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hockey Asia Cup 2025 Final: टीम इंडियाने रचला इतिहास! चौथ्यांदा जिंकला 'आशिया कप', फायनलमध्ये कोरियाचा उडवला धुव्वा; पाकिस्तानलाही पछाडले

एअरलाईन्स कंपन्या गोव्याला सोडून इतर राज्यांना प्राधान्य देतायेत... सरकारच्या धोरणांचा राज्याचा पर्यटनाला फटका, आलेमाव यांचा आरोप

Goa Flood Relief: पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गोवा सरसावला! पंजाब आणि छत्तीसगडला आर्थिक मदतीची घोषणा; देणार प्रत्येकी 5 कोटी रुपये

International Literacy Day 2025: शिक्षण हवं सर्वांसाठी, पण... शहरात सुलभ, ग्रामीण भागात दुर्लभ! कारणं काय?

Weekly Career Horoscope: या आठवड्यात मेहनतीचे फळ मिळणार! 3 राशींना मिळेल इच्छित नोकरीची सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT