Rules Of Eating Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Rules Of Eating: बेडवर बसून जेवल्यास माता लक्ष्मी होऊ शकते नाराज

बदलत्या जीवशैलीमुळे आपण रस्त्याच्या कडेला उभं राहून किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण जेवण करतो. तर अनेक लोक बेडवर बसून जेवण करणे पसंद करतात. पण असे केल्यास माता लक्ष्मी नाराज होउ शकते.

Puja Bonkile

Rules Of Eating: भारतात अनेक लोक धार्मिक गोष्टींवर लक्ष ठेवतात. तसेच कोणतेही शुभ कार्य असल्यांस प्रत्येक गोष्टींचे पालन केले जाते. पण सध्याची जीवनशैली पाहता लोकांमध्ये बदल झालेला पाहायला मिळत आहे.

जेवण करण्याची पद्धत देखील बदलली आहे. एक एक घास तोंडी घेऊन तो नीट चावून खावा असं भारतीय अन्नशास्त्र सांगितले आहे. त्याच प्रमाणे जेवण्यासंबंधी काही नियमही शास्त्रात सांगण्यात आले आहेत. स्वयंपाक घरात खाली मांडी घालून बसावे आणि जेवणाचा आस्वाद घ्यावा. तसेच खाली जमीनीवर वसून जेवण करणे फायदेशीर असते.

सध्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे आपण कुठेही काहीही खात असतो. म्हणजे रस्त्याच्या कडेला उभं राहून किंवा अगदी घराच्या कोणत्याही कोपऱ्यात आपण जेवण करतो.

आजकाल लोकं तर अगदी बेडरूनमध्येही जेवतात. पण भारतीय संस्कृतीत याला शुभ मानले जात नाही. बेडरुममध्ये जेवण करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. काही नियम आहेत ज्याचे पालन न केल्यास माता लक्ष्मी नाराज होउ शकते.

पुर्वी लोकं घरातील स्वयंपाक घरात जेवत असे. पण आता अनेक लोक घराच्या बेडरुममध्येही जेवताना दिसतात. शास्त्रात सांगितल्या गेल्याप्रमाणे बेडवर बसून खाल्ल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि घरात दारिद्र्य येते. तसेच नकारात्मक शक्ती घरात वास करते.

बेडरुममध्ये त्या दोन व्यक्ती शारीरिकरित्या एकत्र आलेल्या असतात. त्यामुळे अशा ठिकाणी जेवणे करणे टाळले पाहिजे असे शास्त्रात सांगितलेले आहे. याशिवाय बेडवर बसून जेवण करणे हा त्या बेडच्या नकारात्मकतेला जन्म देते असे शास्त्रात सांगितले आहे.

बेडवर बसून खाणे म्हणजे लक्ष्मीचा अनादर करण्यासारखे आहे. असे मानले जाते की भोजनाचा संबंध गुरू आणि राहूशी आहे. बेडवर बसून जेवताना राहुलाही राग येतो आणि समृद्धी कमी होऊ लागते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीतील धरालीमध्ये ढगफुटी, अनेक घरं गेली वाहून; 4 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO

Shubman Gill: मालिकावीर शुभमन गिलला पदकासोबत मिळाली 'दारूची बाटली', कारण काय? किती आहे किंमत? जाणून घ्या

Konkani Language: 38 वर्षांत राजपत्र कोकणीतून प्रकाशित करण्याचा प्रयत्नही कुठल्या सरकारला करता आला नाही; भाषा अभिमान आणि वास्तव

Satyapal Malik: "गोवेकरांची जगण्याची पद्धतच अनोखी" गोव्याचं कौतुक करताना थकत नव्हते सत्यपाल मलिक

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT